युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 23 चा नांदगाव खंडेश्वर तालुकास्तरीय बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्पना वानखडे गटशिक्षणाधिकारी पं.स. नांदगाव खंडेश्वर ह्या होत्या तर विलास बाबरे विस्तार अधिकारी शिक्षण, कमलाकर कदम मुख्याध्यापक, हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच तीलोत्तमा घोडेस्वार सरपंच मोखड आणि सुनिल सिरभाते सामाजिक कार्यकर्ते बक्षीस वितरक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज मंडे, प्रास्ताविक जितेंद्र यावले तर आभार प्रदर्शन प्रशांत भगेवार यांनी पार पाडले.
अमरावती जिल्ह्यामध्ये इतर तालुक्याचे तुलनेत नांदगाव खंडेश्वर मध्ये सर्वाधिक बक्षीस शिक्षकांनी मिळविल्याचे कल्पनाताई वानखेडे यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले.
व्हिडिओ निर्मिती स्पर्धे मधून खूप काही शिकायला मिळाले असे असे सुरज मंडे यांनी आपल्या मनोगतामधे व्यक्त केले. याप्रसंगी विष्णू आडे विजयी स्पर्धकांचे वतीने आपले मनोगत व्यक्त केले.
पाहुण्यांचे शुभहस्ते विजयी स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने खालील स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयात व गटांमध्ये बक्षीस मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
त्यामधे प्रामुख्याने अंकुश गावंडे यांना गट 1 ली ते 2 री, 3 री ते 5 वी, 6 वी ते 8 वी, 9 वी ते 10 वी आणि 11 वी ते 12 वी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र यामधे प्रथम क्रमांकचे पाच, द्वितीय क्रमांकचे आठ तर तृतीय क्रमांक नऊ असे एकूण 22 बक्षिस मिळाले तर सूरज मंडे यांना 6 वी ते 8 वी सामाजिक शास्त्र प्रथम व द्वितीय, गट 9 वी ते 10 वी सामाजिक शास्त्र मध्ये प्रथम आणि गट 3 री व 5 वी भाषा मध्ये द्वितीय क्रमांक असे एकूण चार बक्षीस मिळाले.
विकास वानखडे गट 3 री व 5 वी भाषा मध्ये प्रथम, गट 1 ली व 2 री गणित मध्ये द्वितीय, आणि भाषा मध्ये द्वीतीय क्रमांक असे एकूण तीन बक्षिस मिळाले. छाया पोटेकर गट 6 वी ते 8 वी भाषा मध्ये प्रथम आणि गणित मध्ये प्रथम असे दोन बक्षीस मिळाले.
संगीता सुरज मंडे गट 3 री व 5 वी परिसर अभ्यास प्रथम, गट 1 ली व 2 री इंग्रजी मध्ये द्वितीय क्रमांक असे दोन बक्षीस मिळाले. मेघना काळे गट 6 वी ते 8 वी विज्ञान मध्ये द्वितीय तर गट 3 री व 5 वी गणित मध्ये द्वितीय क्रमांक असे दोन बक्षीस मिळाले.
पांडुरंग महादेवराव भगेवार गट 1 ली व 2 री भाषा मध्ये प्रथम क्रमांक संगिता किसनराव सोळंके यांना गट 3 री व 5 वी गणित मध्ये प्रथम क्रमांक, विष्णुदास नामदेवराव आडे गट 1 ली व 2 री इंग्रजी विषयामध्ये प्रथम क्रमांक, जगदिश वासुदेवराव माहुलकर यांना गट 6 वी ते 8 वी विज्ञान मध्ये प्रथम क्रमांक, किशोर खोब्रागडे यांना गट 6 वी ते 8 वी विज्ञान मध्ये तृतीय क्रमांक, अल्का वर्धे गट 1 ली व 2 री भाषा मध्ये द्वितीय क्रमांक, ज्योती वैद्य गट 6 वी ते 8 वी इंग्रजी मध्ये प्रथम क्रमांक, फकीर रज्जाक शेख यांना गट 1 ली व 2 री भाषा मध्ये तृतीय क्रमांक चे बक्षीस मिळाले.
खाजगी संस्थेचे अरविंद राठोड यांना गट 9 वी ते 10 वी इंग्रजी मध्ये प्रथम क्रमांक तर शशिकांत भास्कर राठोड यांना गट 6 वी ते 8 वी गणित मध्ये बक्षिस मीळाले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता सूरज मंडे, अंकुश गावंडे, विकास वानखडे, पी.एम.भगेवार, किशोर खोब्रागडे, विष्णू आडे, छाया पोटेकर, संगीता सुरज मंडे, अल्का वर्धे, मेघना काळे, संगिता सोळंके, जगदिश माहुलकर, ज्योती वैद्य, अरविंद राठोड, शशिकांत राठोड, कमलाकर कदम, जितेंद्र यावले, राजेंद्र देशमुख, धनाजी चव्हाण, किशोर गणवीर, स्वाती पोकळे, यांचेसह, बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.



