भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी धानोरा तालुका तर्फे आज अतुल रामटेके बस स्थानक प्रमुख गडचिरोली यांना निवेदन देऊन नागरिकांच्या सेवेसाठी धानोरा मधून विविध ठिकाणी बस सेवा सुरू करण्याची विनंती करण्यात आली.
तसेच नव्याने सुरू झालेल्या सावनेर आगाराची धानोरा – नागपूर बस चा वेळापत्रक बदलवून धानोरा येथून सकाळी 5.30 ऐवजी सकाळी 6.00 वाजे करण्यात याव व सायंकाळी नागपूर येथून 4 वाजे करण्यात यावी.
तसेच जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांसाठी शाळेसमोर बस थांबा देण्यात यावा या आशयचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना भाजपा तालुका अध्यक्ष साजन गुंडावार,संजू कुंडू नगरसेवक, सुभाष धाईत,राकेश दास,तुफान उंदिरवाडे उपस्थित होते.



