Home शैक्षणिक धानोरा तालुक्यातील जय पेरसापेन हायस्कूल माळंदा व्हिडिओ निर्मितीत प्रथम तर मुख्यमंत्री माजी...

धानोरा तालुक्यातील जय पेरसापेन हायस्कूल माळंदा व्हिडिओ निर्मितीत प्रथम तर मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा तृतीय क्रमांक…

भाविकदास करमनकर

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

  धानोरा 07 मे 2025 : 

          गट साधन केंद्र पंचायत समिती धानोरा व जिल्हा परिषद गडचिरोली द्वारे तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023, उत्कृष्ट शिक्षक/ केंद्रप्रमुख “मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा 2024-25” च्या विजेत्यांच्या पुरस्कार वितरण समारंभ गटशिक्षणाधिकारी गटसाधन केंद्र धानोरा यांच्या वतीने आयोजित केला होता.

        व्हिडिओ निर्मितीत प्रथम क्रमांक अशोक बढई (भाषा), चिरंजीव गद्देवार (गणित). तर जय पेरसापेन हायस्कूल माळंदा शाळेने “मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमामध्ये सहभागी होऊन संस्थेच्या मार्गदर्शनाने धानोरा तालुक्यातील खाजगी गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

        करिता त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून मनोहर पाटील पोरेटी, प्रमुख पाहुणे म्हणून डायट चे कार्यकारी प्राचार्य धनंजय चापले, धानोऱ्याचे गटशिक्षणाधिकारी आखाडे, अबूझमाड शिक्षण मंडळाचे सचिव तथा भगवंतराव हायस्कूल गडचिरोलीचे प्राचार्य समशेर खान पठाण व इतर मान्यवारांची प्रमुख उपस्थिती होती.

       यावेळी प्राचार्य समशेर खान पठाण म्हणाले की गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे आजचे युग स्पर्धात्मक असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक म्हणून आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

        शाळेने व्हिडिओ निर्मिती, “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” पुरस्कार स्वीकारताना शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करताना याचे श्रेय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाला व शाळेतील सर्व पालक वर्गांच्या परिश्रमाला जात असल्याचे सांगितले.