“भारत पाक युद्धाचे मूळ”…
14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी अनुक्रमे पाकिस्तान आणि भारत या दोन राष्ट्राची निर्मिती ब्रिटिशांनी हिंदुस्थानची फाळणी करून केली.
त्यावेळी ब्रिटिशांनी तत्कालीन 565 संस्थानिकांना आवाहन केले होते की, तुम्ही एकतर भारतात किंवा पाकिस्तानात विलीन व्हा. अथवा स्वतंत्र राहा.
565 पैकी 562 भारतात विलीन झाली.उरले शेवटी तीन.एक गुजरातचा नवाब,हैद्राबादचा निजाम आणि काश्मीरचा राजा हरिसिंग. गुजरातचा नवाब भारतात विलीन झाला.17 सप्टेंबर 1948 रोजी हेंद्राबादचा निजाम पोलीस ऍक्शनमुळे शरण येऊन भारतात विलीन झाला.
परंतु ,काश्मीरमध्ये 90% जनता मुस्लिम आणि त्यांचा राजा हरिसिंग हिंदू…….
त्यामुळे पाकिस्तानच्या जीनाला वाटलं की,काश्मीर हे मुस्लिम जनतेचं असल्यामुळे साहजिकच पाकिस्तानात विलीन व्हायला पाहिजे. शिवाय पाकिस्तानच्या सीमेला लागूनच असल्यामुळे पाकिस्तानची ईच्छा असणे साहजिकच आहे.
परंतु , राजा हरिसिंग मात्र ना भारतात ना ही पाकिस्तानात विलीन होण्यास टाळाटाळ करत होता. कारण त्याला ब्रिटिशांनी आवाहन केल्यामुळे आणि जवळपास 750 वर्षांपासून काश्मीरचा स्वतंत्र इतिहास असल्यामुळे तो स्वतंत्र राहू इच्छित होता.
परंतु ,पाकिस्तानच्या जीनाला मात्र काश्मीर स्वतंत्र न राहू देता ते पाकिस्तानमध्ये विलीन झाले पाहिजे यासाठी ते प्रयत्नात होते.
राजा हरिसिंगची स्वतंत्र राहण्याची जिद्द पाहून जिनाने काश्मीरमध्ये ” कबाली ” एक प्रकारची रानटी अन्याय अत्याचार करणारी दहशतवादी सेना काश्मिरात पाठवली. या कबालीने काश्मिरात जाऊन नंगानाच सुरु केला. सगळीकडे अराजकता, अनागोंदी माजविण्यास सुरुवात केली. तरीसुद्धा राजा हरिसिंग पाकिस्तानमध्ये विलीन होण्यास तयार होत नव्हता. तेंव्हा जिनाने पाकिस्तानी सेना पाठवून काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या. आतामात्र राजा हरिसिंग बिथरला, आणि शेवटी त्याने निर्णय घेतला की आपण भारतात विलीन व्हावे. म्हणून त्याने तसा पंडित जवाहरलाल नेहरू सोबत करार केला. त्या करारानुसार काश्मीर भारतात विलीन होईल, विलीन झाल्यानंतर काश्मीर राज्याला स्वतंत्र आणि विशिष्ट दर्जा देण्यात यावा. असा करार करून काश्मीर भारतात विलीन झाल्याची राजा हिरिसिंग आणि नेहरुनी घोषित केले. तोपर्यंत पाकिस्तानच्या सेनेने काश्मीरचा एक तृतीयांश भागावर ताबा मिळवला होता.
जेंव्हा काश्मीर हा भारताचा भाग या विलीन होण्याच्या करारामुळे झाला. त्यामुळे पाकिस्तान अजून चिडला आणि आणि त्याने काश्मीरमध्ये अजूनच नंगानाच सुरु केला.
मग मात्र भारताने आपली सेना पाठवून काश्मीरचे पूर्ण संरक्षण केले. आता मात्र पाकिस्तान आणि भारत या दोन राष्ट्रात आंतरराष्ट्रीय युद्ध घोषित झाले. हे युद्ध जवळपास 14 महिने काही दिवस चालले. आणि 5 जानेवारी 1949 रोजी युनोने दोन्ही राष्ट्राना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानला आदेश दिले की, दोन्ही राष्ट्राचे सैन्य जिथे असतील तिथेच थांबावे तीच तुमची LOC ( Line of Control ) असेल अर्थात आंतरराष्ट्रीय सीमा असेल.
म्हणून काश्मीरच्या ज्या भागापर्यंत भारतीय सेना 5 जानेवारी 1949 रोजी पोहोचली होती. त्या भागाला भारत व्याप्त काश्मीर असे म्हणतात. आणि काश्मीरच्या ज्या भागापर्यंत पाकिस्तानी सेना पोहोचली होती. तो भाग म्हणजे पाकव्याप्त कश्मीर म्हणून घोषित केले.
या काश्मीरच्या एकूण भुभागापैकी जवळपास 65 % भाग भारताकडे आहे आणि 33% भुभाग पाकिस्तानकडे आहे.उर्वरित भागात LOC चा भाग आहे.आणि याच भागात आणि पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तान आपले दहशतवादी अड्डे चालवून भारताकडून संपूर्ण काश्मीर आपल्याकडे पुन्हा मिळविण्यासाठी सतत 75 वर्षांपासून प्रयत्न करतो आहे.
आणि राजा हरिसिंग आणि पंडित नेहरू अर्थात काश्मीर आणि भारत यांच्यातील विलीन होण्याच्या करारानुसार काश्मीर राज्याला स्वतंत्र आणि विशिष्ट दर्जा भारतीय संविधानातील 370 अनुच्छेदानूसार दिल्यामुळे पाकिस्तानची आगपाखड झाली.
आणि आता 2019 मध्ये 370 कलम हटवून भारताने आता काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दाखवून दिल्यामुळे आता पाकिस्तानला काश्मीर आपल्याला पूर्ण कधी मिळूच शकत नाही. असे वाटल्यामुळेच त्याने हा पहलगामचा हल्ला घडवून आणला आहे!
म्हणूनच…….
ऑपरेशन सिंदूर…
आपल्याला घडवून आणावे लागले. आता हे युद्ध किती दिवस चालेल हे आत्ताच सांगता येणार नाही…
परंतु , या युद्धाचे रूपांतर जागतिक तिसऱ्या अंतिम महायुद्धात अर्थात अणूयुद्धात नाही झाले तर…
1948, 1965, 1971, 1998 च्या युद्धाच्या भारत पाक युद्धाच्या अनुभवातून विजय आपलाच निश्चित होईल….
परंतु , याचे दुष्परिणाम मात्र दोन्ही देशांना भोगावेच लागतील. कारण दोन्ही देशातील सर्वसामान्य जनतेला युद्ध नकोय…..
कारण……..
शेवटी , युद्धाचे परिणाम मात्र कोणत्याही राजकीय पक्षांना, नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, सरकारी नोकरदारांना, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना जास्त भोगावे लागत नाहीत…..
परंतु , सर्वसामान्य 80% जनतेला जगता – जगता मरावे लागते आणि मरता – मरता जगावे लागते.
मग ती भारतीय जनता असो की पाकिस्तानची….
कारण दारिद्र्य आणि मृत्युला देश नसतो आणि सीमाही नसतात………



