Home Social चिमूर तालुक्यातील मौजा पिपर्डा येथील बौध्द महासभा,मिलींद फेडरेशन तथा भिमाई महिला मंडळ,यांच्या...

चिमूर तालुक्यातील मौजा पिपर्डा येथील बौध्द महासभा,मिलींद फेडरेशन तथा भिमाई महिला मंडळ,यांच्या संयुक्त विद्यमाने खास वैशाख बुध्द पोर्णिमा निमित्य धम्मपाल बुध्द विहार लोकार्पण सोहळा तथा तथागत भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची प्रतिस्थापना… — दिनांक ११ ते १३ में पर्यंत ३ दिवस चालणार विविध कार्यक्रमांना अनुसरून प्रबोधन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

        तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनानिमित्ताने दिनांक ११/०५/२०२५ ते १३/०५/२०२५ पर्यंत धम्मपाल बुध्द विहार,मौजा पिपर्डा,ता.चिमूर येथे,३ दिवसिय कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध बांधव व बौद्ध भगिनींद्वारे करण्यात आले आहे.

      रविवार,दिनांक ११ मे २०२५ ला रात्री ८.०० वा.पर्यंत बुध्द-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.प्रबोधात्मक गित सुरमा बारसागडे आणि त्यांचा संच नागपूर सादर करणार आहे.

****

१२ में चे विविध कार्यक्रम…

   पहिले सत्र…‌

         सोमवार,दिनांक १२ मे २०२५ सत्र पहिले सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.सकाळी ८.०० वाजता भिक्खु संघ,समता सैनिक दल,बौध्द उपासक-उपासिका यांची संयुक्त धम्म रॅली गावातून निघणार आहे.

     तदनंतर सकाळी ९.३० वा. भिक्खु संघाव्दारे ध्वजारोहण होणार आहे तर सकाळी १०.०० वा.भिक्खु संघांना भोजनदान देण्यात येणार आहे.

       सकाळी ११.०० वा. : धम्मपाल बुध्द विहार लोकार्पण सोहळा व बुध्दमूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे उद्घाटन आयु.प्रा. रवि कांबळे सर सामाजिक कार्यकर्ते,चंद्रपूर यांचे शुभ हस्ते होणार आहे.

     धम्मपाल बुध्द विहाराचे लोकार्पण सोहळा पूज्य भदंत धम्मघोष मेहता,यांचे शुभ हस्ते होणार आहे व बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापना तेच करणार आहेत.यानंतर पुज्य भदंत धम्मघोष मेहता यांच्याद्वारे धम्मदेसना होणार आहे.

दुसरे सत्र..‌..

       सत्र दुसरे दुपारी १२.०० वाजता सुरू होणार आहे.दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.डॉ.राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर जिल्हा,कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आयु.अॅड.भुपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ता नागपूर हे असणार आहेत.आयु.अॅड. ज्ञानेश्वर नागदेवते,आयु.अनिकेत दुर्गे हे विशेष मार्गदर्शक असणार आहेत.

   कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आयु.शिवरामजी मेश्राम अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा ता. शाखा चिमूर,आयु. हर्षबोधी मेश्राम स.सै.दल चंद्रपूर,आयु. डॉ.देवानंद वासनिक उपजिल्हा रुग्णालय चिमूर,आयु.लोखंडे क्षेत्रसहायक,खडसंगी हे असणार आहेत.

तिसरे सत्र…‌

          तर तिसऱ्या सत्रात सायंकाळी ७ वाजता आ.नितेश कराडे यांचे व्याख्यान होणार आहे.ते फिनिक्स अकॅडमी वर्धा चे संचालक आहेत.त्यांचे महाराष्ट्र राज्यात अनेक व्याख्यानं गाजलेली आहेत.

*****

मंगळवार,दिनांक १३ मे २०२५…

पहिले सत्र…

        पहिल्या सत्रात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात रांगोळी स्पर्धा आणि भिम- बुध्द गितांचा कार्यक्रम समाविष्ट आहे..

दुसरे सत्र…

      दुसऱ्या सत्राला दुपारी १२ वाजता प्रारंभ होणार आहे.या सत्राचे अध्यक्ष प्रा.चंद्रमनी घोनमोडे (सिंदेवाही)असणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खोब्रागडे सिंदेवाही,प्रा.शेखर डोंगरे सिंदेवाही,पि.डी.चुनारकर मुख्याध्यापक शिवाणी माध्यमिक विद्यालय पळसगाव,हे असणार आहेत.

         चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील हरिदासजी शेंडे हे धम्मपाल बुध्द विहाराचे शिल्पकार असल्याने त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.याचबरोबर कु.आरोही सचिन चुनारकर हिचा सुध्दा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

      दुसऱ्या सत्राचे विशेष पाहुणे म्हणून पिर्डाचे सरपंच आकाश भेंडारे,उपसरपंच डॉ.चंदन चुनारकर,पिपर्डा पो.पा.भिमराव चुनारकर,माजी सरपंच रुपचंद बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते हरीदासजी चुनारकर हे असणार आहेत.

    सत्र तिसरे… 

      रात्रोला ९ वाजता होणाऱ्या तिसऱ्या सत्रात समाज प्रबोधनात्मक बुध्द-भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

        राष्ट्रीय प्रबोधनकार,भीमशाहीर साहेबराव येरेकर आणि त्यांचा संपूर्ण संच समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत.

*****

सहभोजन…

    सहभोजन : सायंकाळी ६.०० ते रात्रौ ९.०० वाजतापर्यंत.