Home सांस्कृतिक आळंदी देवस्थानला २४ तासात ज्ञानेश्वरी छपाईसाठी ५० लाखाचा पहीला हप्ता प्राप्त…

आळंदी देवस्थानला २४ तासात ज्ञानेश्वरी छपाईसाठी ५० लाखाचा पहीला हप्ता प्राप्त…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रती छपाईसाठी एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी संत ज्ञानेश्वर महाराज ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यात आळंदी येथे केली होती. याघोषणा करुन २४ तास न होताच आळंदी देवस्थान ला ५० लाखाचा पहीला हप्ता प्राप्त झाला असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी सांगितले आहे.

           यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा भेट देण्यासाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आले होते.

           देवस्थान कमिटी ज्ञानेश्वरी छपाई साठी अनुदानाची मागणी केली असता त्यांनी एक कोटी रुपयाचा निधी तत्काळ जाहीर केला आणि २४ तासाच्या आत आळंदी देवस्थानला ५० लाखाचा पहीला हप्ता प्राप्त झाला आहे. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी जी तत्परता दाखविली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक यावेळी करण्यात आले.

           वास्तवात मंत्री येतात बोलतात, आश्वासन देतात हे सर्वरश्रुत आहे मात्र सामंत यांनी घोषणा करण्या नंतर अवघ्या चोवीस तासात पन्नास लाख रुपयांचा पहीला हप्ता देवस्थानकडे जमा केला आहे. यानिधीद्वारे सर्व सामान्य भाविकांना माऊलींचे साहित्य उपलब्ध केले जाईल असे योगी निरंजनाथ यांनी सांगितले.

          याप्रसंगी मंत्री आकाश फुंडकर, देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष महेंद्र महाजन, पालखी सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, ॲड.रोहीणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील उपस्थित होते.