Home Maharashtra चामोर्शि तालुक्यात खासदार डॉ.नामदेव किरसान यांची वादळ व गारपीटी मुळे नुकसान ग्रस्त...

चामोर्शि तालुक्यात खासदार डॉ.नामदेव किरसान यांची वादळ व गारपीटी मुळे नुकसान ग्रस्त भागात भेट…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

        चामोर्शि तालुकातंर्गत सतत पडणाऱ्या वादळी पावसामुळे व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान व मक्का पिकाला जोरदार फटका बसलेला आहे. संपूर्ण धान नष्ट झाले असता गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी कुणघाडा व फराडा या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केली.

           सदर नुकसानीचे रीतसर वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सुचना तलाठी व कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांना दिल्या.परिसरात अनेक शेतकरी उन्हाळी सिंचनाची सोय असल्याने धान पिकाची लागवड करीत असतात. परंतु सतत दोन- तीन दिवस पडणाऱ्या पाऊस वादळी वारा व गारपीटमुळे शेतकऱ्यांचे तोंडातील घास गेलेले आहे.

        ऐन कापणी व मळणीला आलेल्या धानपिकाची व मक्कापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेवून उन्हाळी धानाची लागवड केलेली होती. परंतु गारपीट व पावसाने झालेल्या नुकसानीमुळे उन्हाळी पिक कसे काढायचे व बँकेचे कर्जे कसे फेडायचे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

            यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेल राजेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष कांग्रेस कमिटी गडचिरोली अनील कोठारे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शि प्रमोद भगत, सरपंच कुणघाडा सौ.अल्काताई घोडरे, उपसरपंच अनील कुणघाटकर,अनिता झीलपल्लीवार सरपंच फरडा सुदर्शन हजारे उपसरपंच नुमचंद भिवणकर, पांडुरंग टिकले, अशोक वासेकर, अविनाश चलाख, दिपक भांडेकर, दशरथ नैताम, अतुल भांडेकर, गणेश दुधबळे, घनश्याम भांडेकर, बारीकराव सुरजागडे, रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, गणेश सुरजागडे, हरीचद्र सुरजागडे दादाजी दुधबळे, सुधीर गिरीसावळे आशिष मशाखेत्री ,आशिष घेर, तेजस कोंडेकर, कुणाल आभारे, राणी देशमुख, चंपत उंदिरवाडे, योगराज मडावी, विजय लाड कुषी अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, व गारपीट ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.