“या विश्वात प्रथम नैसर्गिक उत्क्रांतीतून झालेल्या क्रांतीला प्रथमच शह देऊन प्रतीक्रांती निर्माण करणाऱ्या आर्याच्या कुटनीतीला शह देऊन पुन्हा नैसर्गिक क्रांतीची तत्वे प्रथम पुनरस्थापन करण्यासाठी केवळ……..
तथागत भगवान बुध्द आणि सॉक्रटीस..
या दोन महापुरुषांनी आर्याच्या कुटनीतीला कायमचा सुरुंग लावला…..
त्याचप्रमाणे इथून पुढे या जगात क्रांती आणि प्रतीक्रांतीची भरती /ओहोटीची लाट येतच राहिली. त्याचबरोबर तथागत भगवान बुद्ध आणि सॉक्रेटीस यांच्या नैसर्गिक न्यायाच्या बाजूने असणाऱ्या विचारसरणीच्या क्रांतिकारकांची एक फळी निर्माण झाली.
यामध्ये…..
भगवान महावीर,येशू ख्रिस्त,प्रेषित मोहमद पैगंबर,गुरुनानक,इत्यादी धर्मसंस्थापक……
त्यानंतर तत्ववेत्ते,प्लेटो,ऍरिसटॉटल,
त्याचबरोबर समाजसुधारक आणि मानवतावादी विचारवंत,मॉन्टेस्क्यू,रुसो,व्हाल्टेअर,दीदेरो,थॉमस पेन,जॉर्ज वॉशिंग्टन,बेंजॉमीन फ्रॅंक्लीन,थॉमस जेफरसन,संत कबीर,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत गाडगेबाबा इत्यादी वारकरी संप्रदाय….
त्याचबरोबर या नैसर्गिक न्यायाला अर्थात लोकशाही मूल्यांना अविष्कारीत करण्यासाठी राजाश्रय देणारे……
सम्राट अशोक,सम्राट कनिष्क,सम्राट हर्षवर्धन,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज…
इत्यादी ज्ञात अज्ञात राजे,त्याचप्रमाणे,शेवटचे कुटनीतीच्या मानेवर कायमचा घणाघाव घालणारे क्रांतिकारक, महामानव,महासुर्य,संविधान क्रांतीचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सर्व क्रांतिकारक मंडळी……
जी नैसर्गिक न्यायासाठी, लोकशाही मूल्ये अर्थात स्वातंत्र्य, समता,न्याय आणि बंधुता प्रस्थापित करून तिच्या अविष्कारासाठीच जीवन व्यतीत करणारी तत्ववेत्ते, महापुरुष , महामाता मंडळी….
तर दुसऱ्या बाजूला कुटनीतीच्या रूपाने नैसर्गिक तत्वाला विरोध करून कृत्रिम बुद्धीमता पेरणारे षंढ आणि नेभळट असलेले स्वतःचा देश जगात कुठेच नसलेले, बाहेरून आलेले आर्य (भारतीय ब्राम्हण्य वृत्तीचे असलेले) अर्थात सोफिस्ट…..
आर्य त्यांच्याच वंशाचे आणि वैचारिक वंशाचे असलेले सर्व….
मनू ( मनुस्मृती कार ) आर्यचाणक्य उर्फ विष्णूगुप्त कौटील्य,पुष्य मित्र शून्ग…
अगदी अलीकडच्या काळातील,म.घोरी,म. गझनी,बेनिटो,मुसोलिनी,ऍडॉल्फ हिटलर,किम जोंग,व्लादिमीर पुतीन,गोळवलकर गुरुजी,हेडगेवार,सावरकर,मोहन भागवत,नरेंद्र मोदी,अमित शाह,देवेंद्र फडणवीस आणि यांच्यासोबत असणारे सर्वच राजकीय पक्ष आणि नेते……
ही मंडळी दुसऱ्या बाजूला….!
अर्थात……..
या दोन गटांना आजच्या संविधानिक भाषेत आपण संविधानवादी आणि संविधानविरोधी असे समजू……..
या संविधानवादी आणि संविधानविरोधी शक्तीमध्ये सुमारे 5000 वर्षांपासून क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या रूपाने या जगात आणि विशेषतः भारतात हा संघर्ष सतत चालत आलेला आहे!
या दोन विचारसरणीच्या संघर्षात मात्र येथील सर्वसामान्य माणूस संभ्रम आणि गोंधळाच्या मानसिकतेत अडकून धार्मिक आणि कर्मकांडाच्या आंधळ्या विश्वासातून बाहेर पडूच नये म्हणून संविधानविरोधी शक्तीने पुरेपूर प्रयत्न केले.विशेष म्हणजे 2025 च्या काळात बऱ्याच प्रमाणात ते यशस्वी सुद्धा झाले.!
त्याच संभ्रमाच्या चक्रीवादळात सापडलेल्या सर्वसामान्य भारतीय जनतेला बाहेर काढण्यासाठीच …..
ही संविधान जागृतीची लेखमाला आहे….
जागृतीचा कृतिशील लेखक..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689….



