Home Maharashtra सातारा गाव शिव्या मुक्त करण्याचा निर्धार,१ मे च्या ग्रामसभेत घेतला ठराव… ...

सातारा गाव शिव्या मुक्त करण्याचा निर्धार,१ मे च्या ग्रामसभेत घेतला ठराव… — सरपंच गजानन गुळधे यांचा अभिनव उपक्रम,शिव्या न देण्याची घेतली शपथ…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी.. 

     चिमूर तालुक्यातील सातारा गाव आदर्श संकल्पना घेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवून विकासाची कामे करीत असताना सरपंच गजानन गुळधे यांनी अफलातून अभिनव उपक्रम राबवित गावात महिलांच्या आदरासाठी गाव शिव्या मुक्त करण्याचा निर्धार करीत दिनांक १ मे च्या ग्रामसभेत ठराव घेतला आहे.

          ताडोबा व्याघ्र प्रकल्प च्या शेजारी सातारा गाव असून या गावचे सरपंच गजानन गुळधे विकासाचा मॉडेल करीत आदर्श गाव घडविण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांनी माझं गाव महिला भगिनीं साठी आदर राहावा यासाठी शिव्या मुक्त गाव निर्माण करण्याचा संकल्प केला.

       दिनांक १ मे च्या ग्रामसभेत आपल्या गावात महिलांना शिव्या देणार नाही.अपशब्द बोलू नये.गावात शांतता, बंधुता, समानता राहावी यासाठी अभिनव उपक्रम म्हणजे गाव शिव्या मुक्त.

      गावात कोणी महिलांना अपशब्द, शिव्या दिल्यास त्यांचे वर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत करणार असून दंड न भरल्यास ग्रामपंचायत मधून कोणतेही दाखले देण्यात येणार नाही.असा ठराव ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. 

      या ठरावाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे.