ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- स्पाइस विलास मेश्राम आरमोरी / वैरागड येथील रहीवासी असून या बालकलाकाराला क्रान्ती-कारी व सविधानावर आधारित दरिद्री व गरिब भिकाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या “26 नोव्हेबर ” या चित्रपटात ” टिक्कुची’ भूमिका साकारणार आहे.
“26 नोव्हेंबर ” हा चित्रपटजम्बोद्वीप प्राडक्सन द्वारा निर्मित असुन या चित्रपटाचे निर्माते- अनिलकुमार जवादे, सहनिर्माते – निलेश ओनकार हे आहेत तर लेखक / दिग्दर्शक सचीन उराडे सर असुन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत – अनिकेत विश्वासराव, सयाजीराव शिंदे, गणेश यादव, डॉ. विलास उजवणे, विजय पाटकर मुस्ताक खान, अंजली उजवने, भरत गोगावले या सारखी अनके नामवत कलाकारानी या चित्रपटात आपली भूमिका साकारलेली आहे.
हा चित्रपट येत्या 9 मे 2025 ला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सा, चित्रपटाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमानात स्नेहपुर्वक प्रतिसाद मिळण्याची दाढ शक्यता जनमानसात वर्तवली जात आहे.



