शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
सावरी येथील ज्ञानसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्थे द्वारे संचालित फ्युचर इंग्लिश स्कूल सावरी (बी.) येथील शाळेचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला.यात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.दीपक दडमल यांची प्रमुख उपस्थिती होती.तर प्राचार्य डॉ.लोकेश वासनिक,शिक्षिका स्वाती धानोरकर,नलिना खोब्रागडे, सहाय्यक वैशाली वासनिक हे सुद्धा उपस्थित होते.

या वर्षाचे गुणवंत विद्यार्थी म्हणून नर्सरी मधून प्रथम संचित काळे आला तर,द्वितीय कु.आराध्या भोंगळे ठरली.के.जी.वन मध्ये प्रथम पाराज गजभिये तर,द्वितीय,श्रध्दा जांभूळकर व के.जी.टू मध्ये प्रथम माही घोरुडे तर द्वितीय क्रमांक गितांशू घुमे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.
या वेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार व सत्कार करण्यात आला.



