Home Social मनामध्ये भक्तीचा भाव असेल तर अडथळे येत नाही :- मंत्री भरत गोगावले…...

मनामध्ये भक्तीचा भाव असेल तर अडथळे येत नाही :- मंत्री भरत गोगावले… — आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यास मंत्री गोगावलेंची भेट…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : जन्माला आल्यावर एकदा तरी पंढरपूर व आळंदी ची वारी करावी, तुम्ही पंढरपूर, आळंदी, तिरुपती, कोल्हापूर, शिर्डीला जाता पण ज्या माझ्या राज्यामुळे हा वारकरी संप्रदाय टिकला, तसेच आमचा देश, देव व धर्म टिकला अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला यावे,मना मध्ये भक्तीचा भाव असेल तर काहीही अडथळे येत नाही असे मत रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केले.

        आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला मंत्री भरत गोगावले यांनी भेट दिली. भरत गोगावले यांनी कीर्तनात सहभाग नोंदवला. कीर्तनात गोगावले तल्लीन झाले होते.

         यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, अक्षय महाराज भोसले, भगवान पोखरकर, राहुल चव्हाण, रमेश गोगावले, ज्ञानेश्वर रायकर, विलास कुऱ्हाडे उपस्थित होते.

        भरत गोगावले म्हणाले, राजकारणात आणि खेळात कधी काही होईल हे सांगता येत नाही. राजकारणात कोण कुठे जाईल हे सांगू शकत नाही. अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं आहे, ते त्यांना विचारतो. पुढे ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची पहिली युती आहे. मग, तिसरा आला आहे. अजित पवारांनी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही.

         पण, त्यावर आता काही सांगू शकत नाहीत. पुढे ते म्हणाले, संजय राऊत हे सकाळ चा भोंगा आहेत. दररोज नवनवीन क्लुप्त्या काढत असतात. संजय राऊत यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाहीत. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे चालवतात, राष्ट्रवादी पक्ष अजित पवार तर भाजप पक्ष मोदी आणि अमित शहा चालवतात. अस राऊतांच्या आरोपांवर भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.