Home Social चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार पुरस्काराकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद.. — वामनराव पाटील...

चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार पुरस्काराकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद.. — वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

चिमूर :- चक्रवर्ती सम्राट अशोकांनी आपल्या राजवटीत ८४ हजार स्तूपांची निर्मिती केली.या स्तूपांतून समता,बंधुता,प्रेम साऱ्या जगभर प्रसारित करण्याचे कार्य त्याकाळी झाले.आजही अनेक बुद्धविहारांतून सामाजिक समतेचा संदेश दिल्या जातो.विहारे ही भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असणारी धम्म चळवळीची केंद्रे व्हावीत,या विहारांमधून सामाजिक चळवळीचे कार्य सातत्याने होत रहावे या उद्देश्याने चिमूर तालुक्यातील विहारांकरिता चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धेचे आयोजन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेकडून करण्यात आले आहे.

        या स्पर्धेकरिता बुद्धविहार समित्यांकडून अर्ज मागविण्यात आले.तालुक्यातील ७० बुद्धविहारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

      संस्थेने या स्पर्धेचे निकष ठरवले असून त्या निकषांच्या आधारे निवड समिती बुद्धविहारांचे मूल्यांकन करणार आहे.

       स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विहाराला १० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल.तसेच १० हजार रुपयांचा संगणक आणि ५ हजार रुपयांचे ग्रंथ असा एकूण २५००० रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.भूपेश पाटील,सचिव सुरेश डांगे,सदस्य हरी मेश्राम,विरेंद्र बन्सोड,रामदास कामडी,सुधाकर गणवीर,प्रियानंद गेडाम,नितीन पाटील यांनी कळविले आहे.