Home Maharashtra आदिती तटकरेंचा विभाग अव्वल… — सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर!

आदिती तटकरेंचा विभाग अव्वल… — सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर!

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले.100 दिवसांच्या कार्यक्रमात महिला व बालविकास खातं आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.

       महिला व बालविकास मंत्रालयातंर्गत आदिती तटकरेंचा विभाग राज्यात अव्वल ठरला,तर जिल्हाधिकाऱ्यां पैकी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी नंबर 1 ठरले,आणि उल्हासनगरचे आयुक्तांनी पहिल्या क्रमांकावर बाजी मारली.

****

सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर!

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली.या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन करणे,स्वच्छ करणे,नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे,झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता. 

      100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले.100 दिवसांच्या कार्यक्रमात महिला व बालविकास खातं आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे.

      भाजपा मंत्र्यांची तीन विभाग टाॅप पाचमध्ये आहेत.पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आदिती तटकरेंकडे असलेला महिला व बालविकास आघाडीवर आहे.याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती दिली आहे…

       100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. 

     या निकालानुसार वेबसाईट सुधारणा,कार्यालयीन सोयीसुविधा,तक्रार निवारण,सुलभ जीवनमान,गुंतवणुकीस चालना,तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे….

– 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,  

– ⁠5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,

– ⁠5 जिल्हाधिकारी, 

– ⁠5 पोलिस अधीक्षक, 

– ⁠5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), 

– ⁠4 महापालिका आयुक्त, 

– ⁠3 पोलिस आयुक्त, 

– ⁠2 विभागीय आयुक्त आणि 

– ⁠2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक 

     यांची नावे जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केलाय.

      या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम,गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्यात.