“तुरुंगात डांबल्यानंतर सॉक्रेटीसवर जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल केल्या गेले. या सर्व गुन्ह्याची सुनावणी तेंव्हा न्यायालय आणि संसद सदस्यांनी केली.”
एखाद्या अती महत्वाच्या खटल्याची सुनावणी होत असे तेंव्हा न्यायालय आणि संसद यांच्या समक्ष होत असे.
आरोपीची बाजू मांडण्यासाठी एकटे सॉक्रेटीसच सक्षम होते.सर्व गुन्ह्याची साक्ष देण्यासाठी साक्षीदारांचा प्रतिनिधी म्हणून एकटा मिलिटसच साक्षीदाराच्या खुर्चीत बसून होता.मिलिटसने सर्व गुन्ह्यांची साक्ष दिली.परंतु ,एक आरोप सोडला तर,सर्व गुन्ह्यातील साक्षी मात्र सॉक्रेटीसने ” सत्य आणि शिलाच्या बळावर ” खोट्या पाडून मिलिटसला उघडे पाडले!
तो एकमेव आरोप म्हणजे आथेन्सच्या नगरातील देवाला शिव्या देतो, त्यांना तो मानतच नाही.अर्थात जनतेच्या भावना दुखावल्या या आरोपावरून त्याला देहादंडाची शिक्षा सुनावली.
अर्थात मूळ आरोप म्हणजे या संसद सदस्यांच्या आणि न्यायालयाच्या जो जिव्हारी लागला होता,तो म्हणजे तरुणांना सदवर्तनी बनऊन त्यांना सत्याची ओळख करून देऊन त्यांना सार्वजनिक व्यवस्थेच्या विरोधात जागृत करण्याची सॉक्रेटिसची जिद्दच त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यासाठीच त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची होती.
परंतु ,सॉक्रेटिसच्या सदसदविवेकबुद्धी चातुर्याने ते शक्य झाले नाही.म्हणून या देवदेवतांच्या आरोपावरून ही देहादंडाची शिक्षा सुनावली गेली.
त्याचबरोबर त्यांच्यासमोर दोन पर्याय सुद्धा ठेवले एक तू यापुढे तरुणांना कर्तव्यभ्रष्ट करणार नाही असं लिहून दे,किंवा हा देश सोडून निघुन जा,किंवा आर्थिक दंड भरून सुटका करून घे. तरच आम्ही शिक्षेचा पुनर्वीचार विचार करू.त्यावर सॉक्रेटीसने उत्तर दिले.एक तर मी तरुणांना कर्तव्यभ्रष्ट केलेच नाही. उलट त्यांना सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले, त्यानुसार जागृती करण्यास त्यांना आव्हान केले. हा काही गुन्हा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मी काही नगरातील देवदेवताना मी काही शिव्या दिल्या नाहीत.
मी नास्तिक असल्यामुळे जरी त्यांना मानत नसलो तरी तो सुद्धा माझ्या विचार स्वातंत्र्यावर गदा आहे. असे मी समजतो.म्हणून मी काही गुन्हा केलेला नाही. शिवाय मी जीवनभर माझं स्वतःचं आणि कुटुंबाचं साधं पोट भरू शकलो नाही.तेंव्हा मी आर्थिक दंडही भरू शकत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही मला देहदंडाची शिक्षा देत असाल तर तो काही न्याय नव्हे तर तो केवळ तुम्ही दिलेला निकाल आहे.आणि प्रत्येक निकाल हा न्याय असतोच असे नव्हे.
त्याचप्रमाणे मृत्युची भीतीच मनुष्याने बाळगायला नाही पाहिजे.एका चांगल्या सत्कर्मी कार्यासाठी जर माझा देह कामी येत असेल तर मला त्यात आनंदच होईल.
कारण समाज हा सुस्त बैलासारखा असतो. माझ्यासारखी एखादी गोमाशी या समाजाला जागृत ठेवण्याचे काम करत असते.
प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून समाजपरीक्षण केलेच पाहिजे. त्या जागृतीसाठीच तर माझ्यासारख्या गोमाशीचा उपयोग समाजाला होतो.
मी जर हा देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेतला तर माझी शिक्षा रद्द करण्याचा विचार सांगितला.परंतु ,मी जर तसे केलेच तर मी माझ्याच विचार आणि आचाराशी गद्दारी होईल.जे कदापि मी करूच शकणार नाही.
त्याचप्रमाणे मी इथे माझ्या मुलांना,माझ्या पत्नीला मुद्दाम इथे येऊ दिले नाही.कारण त्यांच्या रडण्याने,भेकण्याने दयेची भीक मागल्यासारखे होईल.आणि जेंव्हा येथे न्याय निवाडा होतो.त्यात देहदंडाची शिक्षा होत असेल, तर दयेची भीक सुद्धा गुन्हेगाराने मागू नये आणि तसा विचार ( दयेची याचिका दाखल करून घेण्याची पद्धत ) सुद्धा न्यायालयाने करू नये.
अशा अनेक युक्तिवादानंतर शेवटी 471 विरुद्ध 30 संसदसदस्य आणि न्यायालयीन सदस्य मिळून यांच्या बहुमताने सॉक्रेटिसला देहदंडाची शिक्षा सुनावली गेली.
एकदा सकाळच्या प्रहरी सॉक्रेटिसचा मित्र क्रेटो त्याला भेटण्यासाठी तुरुंगात गेला.पहारेकरी त्याच्या नेहमीच्या परिचयाचे असल्याने त्याला जाऊ दिले.त्यावेळी सॉक्रेटीस गाढ झोपेत होते. त्यांना झोपेतून उठवून सांगितले की, ” सॉक्रेटीस लवकर चल आम्ही सगळी व्यवस्था या देशातून तुझी पळून जाण्याची केली आहे. घोडागाडी तयार आहे.
तेंव्हा तू उठ आणि चल. ” त्यावर सॉक्रेटीस उत्तरतो, ” क्रेटो, आपण पुन्हा एकदा सुरुवातीपासून या शिक्षेची आपण चर्चा करू.हे बघ मी जर तुमच्या योजनेप्रमाणे पळून गेलो. तर मी दोन देशाचे कायदे मोडले असा त्याचा अर्थ होईल.एक तुरुंगातून गुपचूप पळून जाण्याचा,दुसरा दुसऱ्या देशात त्यांची परवानगी न घेता शिरण्याचा.म्हणजे मी ज्या तत्वज्ञानासाठी जीवनभर जगलो आणि केवळ मृत्यूच्या भयापोटी मी हे कायदे मोडावेत!
अरे मी तुम्हा सर्वाना जीवनभर स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता या निसर्गाने त्याच्या तत्वज्ञानातून आपल्याला प्रदान केलेली जी मूल्ये आहेत, ते पटवून देण्यासाठीच तर मी संपूर्ण आयुष्य खर्ची केले.आणि जेंव्हा त्याच्या आचरणाची वेळ आली तेंव्हा त्याला बगल देणे हे कसे शक्य आहे?
अरे,माझ्यासारख्या म्हणजे दुसऱ्यांना सदवर्तन शिकवणाऱ्याने जर आचरणाची वेळ येताच त्याकडे पाठ फिरवावी?
हे शक्यच नाही……
शिवाय हे तत्वज्ञान अविष्कारीत करण्याचा,प्रस्थापित करण्याचा लढा वयक्तिक पातळीवरच लढल्या जाऊ शकतो.टो राजकारणात जाऊन किंवा सत्तेच्या खुर्चीत जाऊन मुळी लढताच येणार नाही!
म्हणूनच जीवनभर मी समाजाला जागतं ठेवणारी गोमाशी झालो.म्हणून तू आता मला या देहदंडाच्या शिक्षेपासून परावृत करण्याचे आणखी प्रयत्न करू नका.आता तू जा आणि मला मृत्यूच्या शिक्षेची अमलबजावणी होईपर्यंत तरी मला शांत झोपू दे असे म्हणून शेवट क्रेटोला त्याने घालवून दिले.
( या लेखाचा उर्वरित भाग उद्याच्या भागात…)
जागृतीचा कृतिशील लेखक..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689…


