शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
माकोना हे गाव संताची भुमी ओळखली जाते,माकोना येथे दर सोमवारी अखिल भारतीय गुरुदेव मंडळ माकोना यांच्या वतीने विचारांची प्रेरणा करत दिंडी काढली जाते.
३० एप्रिल ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्ताने ग्रामजंयतीचा कार्यक्रम अखिल भारतीय गुरुदेव मंडळ माकोना यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरी ग्रामपंचायतचे सरपंच लोकनाथ रामटेके हे होते.
तर मुख्य अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्या सुरेखा ताई शेंबेकर,माकोना पोलिस पाटील प्रतिभा ताई पिपंळकर,भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका कार्याध्यक्ष जगदीश मेश्राम,आदित्या कारेकार सामाजिक कार्यकर्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते.
समस्त माकोना गावातील नागरिक मोठ्या संख्येने ग्राम जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सावरी बिडकर चे सरपंच लोकनाथ रामटेके सरपंच यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,”पत्थर सारे बाम बनेगे,भक्त बनेगी सेना,या क्रांतीकारक शब्दबध्द वाक्यांनी क्रांतीची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वानीतुन झाली.
तद्वतच इतर विषयांच्या अनुषंगाने मान्यवरांनी मार्गदर्शन केले.



