Home Social सिध्दबेट वारकरी भुषण पुरस्काराने हभप पांडुरंग महाराज साळुंखे सन्मानित…

सिध्दबेट वारकरी भुषण पुरस्काराने हभप पांडुरंग महाराज साळुंखे सन्मानित…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : येथील वैराग्यमुर्ती वै.जयराम बाबा भोसले आळंदीकर यांच्या १७ व्या पुण्यतिथी सोहळा अतिशय भक्तीमय व हरीनाम गजरात साजरा करण्यात आला.

        या पुण्यतिथी सोहळयात विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष व सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी हभप पांडुरंग महाराज साळुंखे यांना सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्था भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व माऊलींचा प्रसाद असे पुरस्काराचे स्वरुप होते.

         यावेळी आयोजक सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज शेवाळे, माजी सभापती डि.डि.भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटिल, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, नंदकुमार कुऱ्हाडे, सागर भोसले, रामभाऊ चोपदार, अजित वडगावकर, सुनील रानवडे, संतोष तु.भोसले, ज्ञानेश्वर गुळुंजकर, अजित मधवे, शिवाजी भोसले, आनंद जोशी, संतोष मो.भोसले तसेच सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी व आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

        या पुण्यतिथी सोहळयात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन व दोन सत्रात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तन सेवा संपन्न झाली.