उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमुर :- चिमूर तालूकातंर्गत मौजा पारडपार येथील सदाशिव उपासराव वल्के वय अंदाजे 60 वर्ष हे आज सकाळी शेतामध्ये बकऱ्या चारीत असताना दबा धरून बसलेल्या रानडूकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
रानडुक्कराच्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले असल्याची मौजा पारडपार वासियांमध्ये चर्चा आहे.
आजू – बाजुच्या लोकांनी आरडा-ओरड केल्यामुळे रानडूक्कर पळून गेले.मात्र रानडूक्कराच्या हल्ल्यात बकऱ्या चारणारे गृहस्थ गंभीर जखमी झाले.
त्यांना तात्काळ प्रथमोपचारासाठी चिमुर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांच्याकडून घटनेची तात्काळ चौकसी व्हावी व उपचारासाठी सदर इसमाला तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी,अशी मागणी गावकऱ्यानी केली जात आहे.



