Home Social नेरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

नेरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

शुभम गजभिये.. 

विशेष प्रतिनिधी…

         चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार प पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटा साजरी करण्यात आली. 

         याप्रसंगी गावातील पाचही वार्डातील बौद्ध उपासक उपासिकांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

       तसेच प्रत्येक वॉर्डातील विहाराचे प्रांगणावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

                      यामध्ये भीम गीत गायन स्पर्धा, डान्स स्पर्धा, समाज प्रबोधनाचा संगीतमय कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला होता. 

         भीम जयंती दिनी ट्रॅक्टर वर बाबासाहेबांची प्रतिमा लावण्यात येऊन डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली जबतक चाद सुरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

             डीजे वरील वाद्यावर तरुण तरुणाई युवक युवती भीम गीतांच्या बोलावर ठेक्यावर ताल धरून नाचत गाजत भीम जयंतीचा मनसोक्तपणे आनंद व्यक्त करीत होते.

        पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

        येथील वार्ड क्रमांक ३ मधील दिपंकर बुद्ध विहार इलेक्ट्रीक रोषणाईने सजविण्यात आले होते.

        मिरवणुकी दरम्यान बाजार चौकातील व्यासपीठांसमोर मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्तपणे सहकार्य करून शरबत वितरण करण्यात आले. तसेच युवा मित्र मंडळी कडून जिलेबी व आलू भाताचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. वार्डातील भीम वस्त्यांमध्ये भोजन दानाने या कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.