Home Social आनंद ई.सोनवाने यांची साकोली-सेंदुरवाफा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य...

आनंद ई.सोनवाने यांची साकोली-सेंदुरवाफा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती…

ऋग्वेद येवले

   उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- येथील सामाजिक कार्यकर्ते, भाजपाचे नेते, शहर महामंत्री, आनंद ईश्वरदास सोनवाने यांची साकोली-सेंदुरवाफा महाराष्ट्र शासन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

         कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री माननीय, मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात ही निवड करण्यात आली आहे.

        या नियुक्तीचे श्रेयबद्दल आमदार परिणय फुके, माजी खासदार सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे व इतर मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी आनंद सोनवाने यांचे कौतुक केले आहे.