Home Social रामगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मतदान जनजागृती निमित्य सायकल रँली…

रामगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मतदान जनजागृती निमित्य सायकल रँली…

युवराज डोंगरे

   उपसंपादक

 खल्लार येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा रामगाव च्या वतीने मतदान जागृती व्हावी म्हणुन गावातुन विद्यार्थ्याची सायकल रँली काढण्यात आली.

         त्यामध्ये “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” अशा प्रकारचे मतदान जागृती करीता नारे लावुन सायकल रँली काढण्यात आली.

         या रँलीमध्ये राजेश निंभेकर शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती दर्यापुर तसेच गटसमन्वयक सुनिल स्वर्गीय, तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी.आर.जामनिक, सहा शिक्षिका प्रमिला थोरात, विषय शिक्षिका अंजु वानखडे , सहा शिक्षक बाळकृष्ण सोळंके, ग्रामपंचायत रामगाव चे ग्रामसेवक गुळदे तसेच अंगणवाडी सेविका संगिताबाई वसु, मदतनीस खांडेकर, शापोआ स्वंयपाकी कल्पना पुणेकर तसेच सर्व विदयार्थ्यांनी मतदान जागृती मध्ये सहभाग घेतला.