वचिंतचे उमेदवार वसंत मोरे कडून ससून रुग्णालयाला उंदराचा पिंजरा भेट…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : वंचितकडून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले उमेदवार वसंत मोरेंनी प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. मात्र प्रचारादरम्यान त्यांनी त्यांची आक्रमक नेते अशी ओळख जपून ठेवली आहे. पुण्यात कोणतीही वाईट घटना घडली की वसंत मोरे तिथे जाऊन त्या घटनेचा जाब विचारतात आणि कारवाईची मागणी करतात. ससून रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर ससूनच्या अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला. हे पाहून उंदराचे पिंजरे घेऊन वसंत मोरे थेट हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात पोहचले.

             यासंदर्भात वसंत मोरेंनी फेसबूक पोस्ट केली आहे. या पोस्टवरुन त्यांनी ससूनच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन त्यांना उंदराचे पिंजरे भेट दिले.जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्य बाबतीमध्ये निर्णय घेतले गेले नाहीत तर भविष्यात यापेक्षाही मोठाले पिंजरे आणून संबंधित अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात कोण येतील, असा इशारा दिला.

          वसंत मोरेंनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलंय की, वंचित बहुजन आघाडी मधील माझा पहिलाच दिवस आणि आमच्या पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून बातमी आली अपघाताने जखमी झालेल्या तरुणाला ससून हॉस्पिटलच्या ICU विभागात ऍडमिट असताना त्या तरुणाला उंदराने चावा घेतल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. म्हणून ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन त्यांना उंदराचे पिंजरे भेट देण्यात आले.

          जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्य बाबतीमध्ये निर्णय घेतले गेले नाहीत तर भविष्यात यापेक्षाही मोठाले पिंजरे आणून संबंधित अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात कोण येतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

           पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital) धक्कादायक प्रकार समोर आला होता. ससून रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे (Rat Bite) मृत्यू झाला होता. सागर रेणूसे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव होतं. सागर रेणूसे नावाचा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता.

            ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं आणि आय सी यु मध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र 26 मार्चला त्याची प्रकृती खालावत होती. उंदीर चावल्याचं समोर आलं. आय सी यु मध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन आज सकाळी त्याचं निधन झालं होतं.