Home Maharashtra महत्वपूर्ण बैठक,पेसा भरती विषयक चर्चा झाली संपन्न..‌ — विविध मुद्दे व...

महत्वपूर्ण बैठक,पेसा भरती विषयक चर्चा झाली संपन्न..‌ — विविध मुद्दे व उपाययोजनांच्या सुचणांचा विचार..‌ — आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती…

राजेंद्र रामटेके 

 विशेष प्रतिनिधी..

      बुधवार 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव श्री.राजेशकुमार मीणा यांच्यासोबत पेसा भरती विषयक महत्वपूर्ण बैठक पार पडली.

              या बैठकीस मंत्री (आदिवासी विकास) ना.श्री.अशोकराव उईके,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,तसेच अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम,राजेंद्र गावित,काशीराम पावरा,शांताराम मोरे,दिलीप बोरसे,भीमराव केराम,हिरामण खोसकर,नितीन पवार,किरण लहामटे,आमश्या पाडवी,राजेश पाडवी,विलास तरे,हरिश्चंद्र भोये आणि आमदार श्रीमती मंजुळाताई गावित,हेमंत सावरा आदी मान्यवर उपस्थित होते.

             बैठकीदरम्यान पेसा भरती प्रक्रियेतील प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक,कार्यक्षम आणि न्याय्य व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आले.