Home Social इंदापूर तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी हभप सचिन मोहिते तर उपाध्यक्षपदी हभप...

इंदापूर तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी हभप सचिन मोहिते तर उपाध्यक्षपदी हभप महेश सुतार… — पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका वारकरी साहित्य परिषद कार्यकारणीची पदनियुक्ती जाहीर… — तर शेकडो वारकऱ्यांची उपस्थिती…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी… 

       टणु तालुका इंदापूर येथील भर्तरीनाथच्या पावनभूमी मंदिरामध्ये वारकरी साहित्य परिषद कार्यकरणी पदनियुक्ती करण्यात आली.               

      जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचे वंशज श्री.गुरु बापूसाहेब देहुकर महाराज यांचे इंदापूर तालुक्यात हजाराहून अनेक भजनी मंडळ,मृदुंगवादक,टाळकरी,तबला वादक,विणेकरी,गायक,वारकरीआणि संप्रदायातील शिष्य तयार झालेले आहेत. 

      म्हणूनच हभप मिटकर गुरुजी यांच्या माध्यमातून पदाधिकारी,सदस्य निवडलेले आहेत. 

        हभप.भाऊसाहेब महाराज हांडे पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषद जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने बैठकीचे आयोजन केले.ते सदर बैठकीचे अध्यक्ष होते.

        या प्रसंगी वारकरी साहित्य परिषदेचे खजिनदार हभप. बाळासाहेब आटोळे महाराज,हवेली प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुरेश वाळेकर,हभप.गणेश महाराज दोरगे दौड तालुका अध्यक्ष,हभप.नाना महाराज गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

         या प्रसंगी हभप भाऊसाहेब हांडे बोलत असताना म्हणाले की,वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून वारकरी,फडकरी,कीर्तनकार,प्रवचनकार,पालखी सोहळ्यातील पायी चालणारी वारकरी यांच्यासाठी शासन दरबारी ज्या ज्या योजना आहेत त्या त्या मानधनाच्या योजना नियमानुसार वारकऱ्यांना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.

         त्याचप्रमाणे महिला हरिपाठ मंडळाची स्थापना करणे,वारकरी साहित्याचा प्रचार आणि प्रसार इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असे भाऊसाहेब हांडे महाराज यांनी उपस्थितांना सांगितले.

         निवडीच्या कार्यक्रमा प्रसंगी हभप मिटकर गुरुजी,सुरेश वाळेकर (हवेली प्रसिद्धीप्रमुख),ह भ प.बाळासाहेब आटोळे ( जिल्हा खजिनदार) यांनी मार्गदर्शन केले. 

          सदर इंदापूर तालुका कार्यकरणीचे गठण करण्यात आले.यामध्ये इंदापूर तालुका अध्यक्षपदी ह भ प.सचिन महाराज मोहिते यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी ह भ प महेश सुतार महाराज निवड करण्यात आली.

       ह भ प कल्याण महाराज नरुटे यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली.याचबरोबर अनेक पदाधिकारी सदस्यांचा इंदापूर तालुका कार्यकारणीमध्ये समाविष्ट करण्यात आला.

          यावेळी मोठ्या संख्येने कार्य करते सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प मिटकर गुरुजी महाराज यांनी केले.

      कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष ह भ प भाऊसाहेब महाराज हांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यकारिणीचे उपाध्यक्ष ह भ प महेश महाराज सुतार यांनी केले.सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.