आरमोरी येथे बहुजन समाज पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा… — विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन सादर…

अश्विन बोदेले 

तालुका प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

        आरमोरी : आज दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता “बहुजनो शासक बनो” अभियाना अंतर्गत बहुजन समाज पार्टी विधानसभा आरमोरीच्या वतीने आरमोरी येथील तहसील कार्यालय येथे भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

           सदर मोर्चाची सुरुवात बाजार चौक आरमोरी इथून झाली. बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी डी.एस.रामटेके सर प्रदेश सचिव बसपा, प्रदीपजी खोब्रागडे जिल्हा प्रभारी बसपा, गणपत तावाडे जिल्हा प्रभारी बसपा, भुजंगराव पत्रिकर जिल्हा सचिव बसपा , भीमराज पात्रिकार सर आरमोरी विधानसभा प्रभारी बसपा, कृपानंद सोनटक्के आरमोरी विधानसभा अध्यक्ष बसपा, जयद्रथ बोदेले आरमोरी विधानसभा कोषाध्यक्ष बसपा, रजुभाऊ लिंगायत तालुका अध्यक्ष आरमोरी बसपा, सिद्धार्थ घुटके , मनोज खोब्रागडे, तुफान कोटांगले, यांच्या नेतृत्वात सदर मोर्चा तहसील कार्यालय आरमोरी येथे धडकला. 

        सदर मोर्चा विविध मागण्यांच्या अनुषंगाने करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, महिला आरक्षणात ओ.बी.सी. /एस.सी. /एस.टी साठी पृथक आरक्षण असलेच पाहिजे, खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद झालेच पाहिजे, गाव तिथे शाळा, शाळा तिथे शिक्षक असायलाच पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळालेच पाहिजे, ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय नोकऱ्या देण्यात यावे.सर्व बेरोजगार पदवीधरांना शासकीय नोकरी मिळेपर्यंत प्रतिमा 20 हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्या, शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरांचे खाजगी वैद्यकीय सेवा बंद करण्यात यावे, गावोगावी शासकीय बस सेवा अधिक व नियमित करावी, वडसा देसाईगंज येथे मेडिकल कॉलेज देण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदन बहुजन समाज पार्टीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले.

             यानंतर बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व जनसमुदायाला संबोधन करण्यात आले. या समोबोधनामध्ये बहुजन समाज पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ,सर्व जनतेने आपल्या हक्क ,अधिकारांप्रती जागरूक राहून व समता मुलक समाज निर्माण करण्यासाठी “बहुजनो शासक बनो” अभियानांतर्गत सत्ता हस्तगत करण्यासाठी व आपले हक्क अधिकार मिळवून सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी सजग राहून संघर्ष करावा. असे आवाहन करण्यात आले.

           यावेळी बहुजन समाज पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते ,महिला, नवयुवक युवक ,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.