छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक

         छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे नविन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रमोद गारोडे बी एस पाटील महाविद्यालय परतवाडा उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जनता कनिष्ठ महाविद्यालय पूर्णा नगर, अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालय आसेगाव पूर्णा, नारायणराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय टाकरखेडा पूर्णा, व्यंकटराव कडू कनिष्ठ महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथील बारावी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे बी ए भाग तीन चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नविन शिक्षणातील बदल तसेच जे विद्यार्थी पुढल्या वर्षी पदविच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणार असेल अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाची रचना कशी असेल हे डॉ. गारोडे यांनी समजून सांगितले. 

            कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे उपस्थित होते. आयोजन छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आय क्यू ए सि यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते . कार्यक्रमासाठी इतर महाविद्यालयातील शिक्षक देशमुख सर, वाघ सर, आशिष ठाकरे डॉ. आशिष काळे, डॉ. भारत कल्याणकर, डॉ रविंद्र इचे, डॉ. प्रविण सदार उपस्थित होते.