जनयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत निलज ग्रामपंचायत सभागृह येथे आढावा सभा सपन्न.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी::-ग्रामपंचायत कार्यालय येथे आज आढावा सभा आयोजीत करणात आली होती.

           बैठकीचे अध्यक्ष स्थानीक जिल्हा परिषद सदस्य श्री. व्यंकटजी कारमोरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गुंडेरावजी भुते (उपसंरपंच निलज),कृषी सहाय्यक श्री.विवेकानंद शिंदे हे होते.

           त्यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विहीर पुनर्भरण आणि ठिबक संच,तुषार संच याबाबत विस्तृत माहीती दिली.तसेच श्री.एस.पी.कुबडे कृषी पर्यवेक्षक यांनी कृषि विभागातील विविध योजनेची माहिती दिली.

         यावेळी आयोजीत कार्यक्रमास श्री.धनराजजी चकोले (ग्रामपंचायत सदस्य,श्री.रामवंद्रजी चकोले (ग्रामपंचायत सदस्य),श्री.शिवराम धावडे (ग्रामपंचायत सदस्य ),श्री.गुडेराव श्रावन चकाले ( पोलिस पाटील ),श्री.राजु चकोले,मनोज टोहणे,रोमण पाहुणे,श्री. प्रदीप चकोले,महेश चकोले,रविंद्र चकोले,राजेंद्र मेश्राम,पराग चकोले,रोहीत चकोले,नत्थु चकोले, इत्यादि शेतकरी बांधव उपस्थीत होते.

         उपस्थित सर्व मान्यवरांचे व सर्व शेतकरी बांधवाचे श्री.विलास नेवारे (ग्रामसेवक) यांनी अभार मानले.