लोकशाही जिवंत ठेवणे काळाची गरज :- डॉ. सतिशभाऊ वारजुकर — संघारामगिरी (रामदेगी )येथे भव्य धम्म समारंभ संपन्न..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

         तपोवन बुद्ध भुमी संघारामगिरी येथे दिनांक 30 व 31 दोन दिवसीय भव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       त्या निमित्त काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिशभाऊ वारजूकर,यांनी उपस्थित दर्शवली व उपस्थित बौद्ध उपासक व उपासिका यांना मार्गदर्शन केले.

         यावेळी माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके,चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक,वर्षाताई शामकुळे,माजी मुख्याध्यापक शंकरपूर काकाजी वाघमारे,एड.जयदेव मून,आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य शुभंम मंडपे,पूज्य भदंत महास्थविर ज्ञानज्योती,पुज्य भिक्खू महास्थविर शिलानंद,तपोभुमी आंबोडा (वर्धा महाराष्ट्र),पु. भिक्खू डॉ.ज्ञानश्री महाथेरो संघराजा (बांग्लादेश),पु.भिक्खू बोधिमित्रा महाथेरो, (बांग्लादेश),पु.भिक्खू अज्जप्रिया महाथेरो (बांग्लादेश),पु.भिक्खू शासनज्योती (बांग्लादेश),पु. भिक्खू मुदितानं(बांग्लादेश),पु. भिक्खू रूपनंदा,(बांग्लादेश),पु. भिक्खू रट्ठपाल, (श्रीलंका),पु. भिक्खु रोहनबोधी, (श्रीलंका),व्हेन.फरापलाद सोम्पॉन्ग बुन्हान (थायलंड),पु. भिक्खू बोधीपालो महाथेरो (औरंगाबाद),पु.भिक्खू सुमनवन्नो महाथेरो (चंद्रपुर),पु.भिक्खू अभिभू गुणानंद (श्रीलंका),पु. भिक्खू करूणंद थेरो (औरंगाबाद),पु.भिक्खू धम्मबोधी थेरो (औरंगाबाद),पु.भिक्खू एन. धम्मानंद थेरो (औरंगाबाद) व संपूर्ण बोद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भन्ते चेत्ती यांनी केले तर आभार अशोक भिमटे यांनी मानले.