जनतेचे आशिर्वाद पाठीशी आहेत, आगामी काळातही पाठीशी उभे राहावे :- राजवर्धन पाटील — राजवर्धनदादा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मांदियाळी! — इंदापूरात दूधगंगा संघाचा परिसर गर्दीने फुलला! — तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांची उपस्थिती!

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धनदादा हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा देण्यासाठी इंदापूर येथे दूधगंगा दूध संघामध्ये मंगळवारी (दि.30) कार्यकर्ते, नागरिकांची मोठी मांदियाळी पहावयास मिळाली. इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते, नागरिकांच्या गर्दीने दूध संघाचा परिसर फुलून गेला होता. यामध्ये युवक वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.

           राजवर्धनदादा पाटील यांचा 1 फेब्रुवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दूधगंगा परिसरात कार्यकर्त्यांनी दुपारी 2 वाजेपासून गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी दादांना बुके, शाल-श्रीफळ व हार-गुच्छाबरोबर, फोटो, पुस्तके, स्मृतिचिन्हे भेट देऊन अभिष्टचिंतन केले. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी दादांच्या हस्ते केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दूध संघावरती सायंकाळी 7 वाजले तरी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी कायम होती. राजवर्धनदादांवरील जनतेचे असलेले प्रेम व विश्वास हा वाढदिवसानिमित्त दूध संघावर लोटलेल्या जनसमुदायातून दिसून आला.

        राजवर्धनदादांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपच्या विविध मोर्चाचे पदाधिकारी, गावोगावचे कार्यकर्ते व नागरिक, पत्रकार, व्यापारी, कर्मचारी, हितचिंतक आदी समाजातील विविध घटकांचा समावेश होता.

        यावेळी कार्यक्रमप्रसंगी शकील सय्यद, अँड.अनिल पाटील, शिवाजीआण्णा शिंदे, माऊली वाघमोडे, निलेश देवकर, अतुल वाघमोडे, राजेंद्र पवार, नेताजी लोंढे, तुषार खराडे, राहुल पाटील, बबलू पठाण, वसंत काळे, मयूर शिंदे, शशिकांत जाधव, प्राजक्ता फडतरे आदींनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन नितीन भोसले यांनी केले. 

चौकट

 जनतेने आशिर्वाद पाठीशी – राजवर्धन पाटील

             इंदापूर तालुक्यात गेली 5 वर्षांपासून काम करीत आहे. आज आलेल्या जनसमुदायामुळे काम योग्य दिशेने चालले आहे याचा प्रत्यय येतो. काम करीत असताना माझ्यावर टीका झाली परंतु मी थांबलो नाही. मी ओळख निर्माण केली, आपण सर्वजण भाऊंसाठीच काम करतो. मी साधेपणाने वागतो, बरेच ठिकाणी खाली बसतो. मोठ्या कुटुंबातील जन्मल्याने जनतेचे अपेक्षा असतात, या अपेक्षांना पात्र राहण्याचा माझा प्रयत्न आहे. माणूस सातत्याने शिकत असतो, त्यानुसार मीही परिपक्व होण्याचा प्रयत्न करीत आहे. जनतेने आशिर्वाद पाठीशी आहेत, आगामी काळातही जनतेने पाठीशी उभे राहावेत, जनतेने आशीर्वाद द्यावेत असे भावनिक आवाहन राजवर्धनदादा पाटील यांनी यावेळी केले.