दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच शिवधर्म फाउंडेशनची आक्रमक भूमिका : इंदापूर येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती…. — दूधाचा दर न वाढल्यास 4 डिसेंबर पासून आमरण उपोषण करणार संस्थापक अध्यक्ष दिपक आणा काटे यांचे पत्रकार परिषदेत उदगार…

बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत आसताना शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक आण्णा काटे म्हणाले की गाय व म्हैस दूध खरेदीचा उत्पादन खर्चापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी कुटुंबांची दयनीय आवस्था होऊ लागली आहे.

         शासनाने इंदापूर तालुक्यात शासकीय दुध खरेदी केंद्र सुरु करून, शासकीय दराने दुध खरेदी दर निश्चित करावे आणि शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक थांबवावी. अन्यथा लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण करण्यात येईल. आसा इशारा शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक आणा काटे यांनी दिला आहे.

           याबाबत इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी दीपक काटे, ज्ञानदेव वणवे, भवानीश्वर शिरगिरे, अभिषेक कोळेकर उपस्थित होते.

         यावेळी मिडीयाशी पुढे बोलत आसताना दीपक काटे म्हणाले की, शेतकऱ्यांची फसवणूक करून, खासगी दूध संघ 26 व 27 रुपये प्रतिलिटर बेकायदेशीररित्या दूध खरेदी करीत आहेत. दुध उत्पादन करण्यासाठी इतर खर्चात होणारी सतत वाढते दर महागाई पाहता दुध उत्पाकांची पिळवणूक होताना दिसत आहे. शासन-प्रशासन याचे कोणताच धाक या दूध संघाला राहिला नाही. त्यामुळे आधीच दुष्काळ महामारीतून सावरत असताना आणखी एक संकट शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे.

        राज्यातील मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांसमोर शेतकऱ्यांना आश्वासित केले होते.शासन निर्णयानुसार दूध खरेदी करण्यात यावी.

          इंदापूर तालुक्यातील दूधगंगा सहकारी दूध संघ बंद पडलेला असल्याचा फायदा घेऊन खासगी दूध संघ हे मनमानी कारभार करत आहेत. अशा अनेक बेकायदेशीर आणि मनमानी खासगी दूध संघांवर शासन, प्रशासन यांनी कायदेशीर व कडक कारवाई करावी. इंदापूर तालुक्यामध्ये शासन निर्णयानुसार शासकीय दूध खरेदी केंद्र उभारावे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 10 जुलै 2015 च्या शासन निर्णयानुसार 1960 चे कलम (79) अ) अन्वये शासन निर्णय काढावा व शासन निर्णयानुसार दूध खरेदी करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

            तसे शासन निर्णय सहकारी व खाजगी दूध संघ या दोघांनाही तत्काळ लागू करावे. अन्यथा इंदापूर तहसिल कार्यालयासमोर दि. 4 डिसेंबर 2023 पासून आमरण उपोषण करण्यात येईल, आसा इशारा यावेळी देण्यात आला.

          किमान 34 रुपयांच्या खाली दूध संघांना दूध खरेदी करू देणार नाही. तथापि सत्य परिस्थिती पाहाता ता दूध उत्पादकाचे दूध 27 रुपयांनी दूध संघाकडून खरेदी केले जात आहे. तरी शेतकऱ्यांचा दूध उत्पादनावर होणारा खर्च पाहाता, उत्पादन खर्चाच्या महागाई निर्देशांकानुसार शासनाने निश्चित दर परिपत्र मार्फत जाहीर करण्यात यावे.