ई-पीक पाहणी व धान खरेदी ऑनलाइनची मुदत वाढवा..  -सरपंच परमेश्वर गावडे यांची तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मागणी..

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी

        धानोरा तालुका अतिदुर्गम असून अबाधित निरक्षर असलेल्या शेतकऱ्यांच्या ई-पिक पाहणीची व धान खरेदी ऑनलाईन ची मुदत वाढवून देण्याची मागणी परमेश्वर गावडे सरपंच ग्रामपंचायत दुर्गापुर देवसाय गावडे,उपसरपंच कामथडा यांनी तहसीलदार धानोरा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना 29 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

        निवेदनात म्हटले आहे की,धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण झालेली नाही.शासनाद्वारे विकसित भारत संकल्प यात्रातंर्गत गावागावात कार्यक्रम सुरू असल्याने तलाठी व इतर कर्मचारी सदर कामात गुंतून असल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळणे कठीण झाली आहे.

         त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना धान विक्री करता ऑनलाईन करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.यामुळे शासनाने सातबारा वरील इ-पीक पाहणीची व धान विक्रीची ऑनलाईन 30 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत वाढण्याची मागणी करण्यात आली आहे.

        शेतकऱ्यांना ऑनलाइन करताना सातबारावर असलेल्या सर्वांचे आधार कार्ड मागविण्यात येत आहेत व घरातील सर्व व्यक्तींच्या नोंद असताना एखाद्या व्यक्ती मयत झाल्यास त्याचे नोंद केली नसल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला सादर करू शकत नाही.तरी आधार कार्ड व मृत्यू दाखल्याची अट रद्द करण्यात यावे,जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही मानसिक व शारीरिक त्रास होणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे.