धानोरा येथे महात्मा फुले पुण्यतिथी शिक्षक दिन म्हणून साजरी..

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी

         धानोरा येथे माळी समाज समन्वय कृती समितीच्या वतीने दिनांक 28 नोव्हेंबर 2023 ला महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.

          धानोरा येथे माळी समन्वय कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जावेद पाशा कुरेशी साहित्यिक विचारवंत नागपूर विशेष अतिथी देवनाजी लेनगुरे माजी उपसभापती पंचायत समिती धानोरा विनोद लेनगुरे माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली महागुजी वाडगुरे माजी पंचायत समिती सदस्य धानोरा पुरुषोत्तम लेनगुरे कार्याध्यक्ष तालुका माळी समाज धानोरा सौ देवांगणी ताई चौधरी सभापती महिला व बालकल्याण नगरपंचायत धानोरा कल्याणी ताई गुरनुले उपसभापती महिला व बालकल्याण नगरपंचायत धानोरा वामनराव गावतुरे उपाध्यक्ष माळी समाज धानोरा सौ किरणताई सोनुले अध्यक्ष माळी समाज महिला मंडळ धानोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

                  कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळी समाज कृती समितीच्या वतीने धानोऱ्यात महात्मा फुले यांची फेरी काढण्यात आली महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. प्रा. जावेद पाशा यांनी मार्गदर्शन करण्यात केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुभाऊ मोहुरले यांनी केले संचालन भास्कर सोनुले तर आभार वामन वाडगुरे यांनी मानले कार्यक्रमाला माळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.