आर्थिक विषमतेची व्यवस्था म्हणजे आर्थिक वर्गीय व्यवस्था ,म्हणजेच गर्भश्रीमंत श्रीमंत,उच्च मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय,गरीब आणि दरिद्री,भिकारी, क्लास 1,2,3,4 श्रेणी अस्तित्वात ठेवणे,शेतमालक आणि शेतमजूर,कारखानदार आणि मिलमजदुर ( कामगार ) अशी आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक रचना कायम ठेवणे ,म्हणजेच आर्थिक विषमता कायम ठेवणे ,म्हणजेच मालक नोकर,अधिकारी कर्मचारी,असा वर्ग कायम ठेवणे हे या आर्थिक विषमतेच्या व्यवस्थेचे कायम उद्दिष्ट राहिलेले आहे.
याचे कारण गरीबी असल्याशिवाय मजूर आणि कामगार असणार नाहीत,शेतात आणि कारखान्यातून वस्तू निर्मितीसाठी लोक श्रम करायला मिळणार नाहीत.कितीही यंत्राने शेती आणि कारखाने आणि कंपन्या चालवायचे म्हटले तरी,शेवटी ते यंत्र चालवण्यासाठी तर मनुष्यबळ हवेच.म्हणून मजूर आणि कामगार आणि कर्मचारी पाहिजेतच.त्यासाठी गरीबी ही असलीच पाहिजे,कारण गरीबी नसेल तर मग काम कोण करणार ? कुणीच करणार नाहीत.
शेती आणि कारखाना आणि उद्योग,कंपनी,यातून ज्या वस्तू निर्माण होतात,त्या दामदुपटीने विकून जो नफा कमवायचा असतो, तो कसा मिळणार ? ही खरी भांडवलदारांची समस्या आहे,या समस्यावरचा एकमेव उपाय म्हणजे गरिबी निर्मूलन न करता,गरीबी कायम ठेवणे हा आहे.आणि गरिबी हटाव चा कार्यक्रम जर कुणी समाजवादी सत्तेवर असणाऱ्या नेत्यांनी ( उदा.नेहरू,इंदिरा ) घेतला ,तर त्यांचे सरकार पडायचे आणि तिथे भांडवलशाही जोपासणारी सत्ता प्रस्थापित करायची,हा मुख्य कार्यक्रम भांडवलदारांचा असतो,ते पार पाडत असताना आपण पाहत असतो.
मनुवाद्यांना सामाजिक विषमता जोपासायची असते,म्हणून ते सतत खटपट करीत असतात, सत्तेतही आपल्या विचाराचे ( म्हणजे मनुवादी,सामाजिक विषमतेचे ) लोक प्रतिनिधी,किंवा बहुजनांतील स्वार्थी आणि ” होयबा” प्रवृत्तीचे लोक असावेत,यासाठी हे मनुवादी सतत प्रयत्नशील असतात.सामाजिक विषमता म्हणजेच जातीची उतरंड,आणि धर्मांधता,अंधश्रद्धा,तसेच असमान संधी आणि दर्जा होय.
बहुजनाला सत्ता संपती प्रतिष्ठा मिळता कामा नये,यासाठी शिक्षणाची संधी,आणि संपत्तीचा हक्क अधिकार नाकारणे,दर्जाची समानता नाकारणे,म्हणजेच उच्चनीचतेचा भाव जोपासणे,म्हणजेच आर्थिक सामाजिक वर्गीकरण करणे ,म्हणजेच विषमता जोपासणे,यासाठी विषमतेची व्यवस्था कायम ठेवणे, हे मनुवाद्यांचे टार्गेट असते.
थोडक्यात काय तर,भांडवलवादी आणि मनुवादी विचाराचे लोक समतेच्या विरोधी कृत्य करण्यात गुंतलेले असतात.यासाठी साम,दाम, दंडभेद या मार्गाचा अवलंब करीत असतात.यासाठी त्यांना नैतिकतेची काहीच आचार संहिता नसते.संविधानिक मार्गाचा अवलंब करीत नाहीत.हिंसेचा वापर करण्यात त्यांना काहीच पाप वाटत नाही.कारण दोघांचेही ध्येय एक,मार्ग एक,टार्गेट एकच असते,ते म्हणजे बहुजनांना आर्थिक आणि सामाजिक आणि धार्मिक गुलामीत कायम ठेवणे.समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय ही नैतिकमूल्य तर त्यांच्यापासून कोसो दूर असतात.
बहुजनांच्या जीवनात कायम अंधार आणि श्रीमंतांच्या म्हणजे शोषकांच्या जीवनात आणि मनुवाद्यांच्या जीवनात कायम प्रकाश असावा हेच यांचे मुख्य धेय्य असते.आहे.त्यासाठीच तर यांची ही धडपड आहे.या उलट बहुजनांची धडपड ही आपण अंधारातून गुलामीतून बाहेर पडण्याची आहे.यामुळे अभिजन आणि बहुजनातील हा संघर्ष जारी आहे.
लेखक : दत्ता तुमवाड
9420912209


