Home Political नगराध्यक्षपदाच्या प्रचारात प्रशांत कुऱ्हाडे आघाडीवर… — मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा...

नगराध्यक्षपदाच्या प्रचारात प्रशांत कुऱ्हाडे आघाडीवर… — मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा पुढे…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत प्रशांत कुऱ्हाडे आघाडीवर असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. त्यांच्या प्रचार मोहिमेला युवक वर्ग, महिला मतदार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

       माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध प्रभागांत घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडण्यास सुरुवात केली आहे. “सुशासन आणि सर्वांगीण विकासाची आळंदी” हे त्यांचे घोषवाक्य ठरत असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

      शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन त्या समस्यांचे समाधान करण्याचा निर्धार प्रशांत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या प्रचारात युवक आणि महिला कार्यकर्त्यांचा वाढता सहभागही लक्षवेधी ठरत आहे.

       राजकीय जाणकारांच्या मते, सध्या नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत प्रशांत कुऱ्हाडे यांच्या प्रचार मोहिमेला सर्वाधिक गती मिळाल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराची रणधुमाळी अधिक रंगतदार होणार असून, शहरवासीयांचे लक्ष या लढतीकडे वेधले गेले आहे.