Home Political पिंपळोद जिल्हा परिषद सर्कलमधून जागृत नागरिक भिमराव कुऱ्हाडे यांनी निवडणूक लढावी, जनतेची...

पिंपळोद जिल्हा परिषद सर्कलमधून जागृत नागरिक भिमराव कुऱ्हाडे यांनी निवडणूक लढावी, जनतेची मागणी…

युवराज डोंगरे

उपसंपादक 

खल्लार :- जिल्हापरिषद निवडणूक रणसंग्राम सुरू झाला असून कोण कोणत्या जि प सर्कल मधून निवडणूक लढवणार यासाठी सर्वत्र चर्चा रंगली आहे.

       दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथिल जागृत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष भिमराव कुऱ्हाडे यांनी पिंपळोद जि. प. सर्कल मधून निवडणूक रिंगणात उतरावे अशी दर्यापूर तालुक्यातील जनतेची मागणी आहे.

       भिमराव कुऱ्हाडे यांनी त्यांच्या प्रयत्नाने लोतवाडा , दर्यापूर, अमरावती येथे मोठमोठे आंदोलन केलीत त्यांची पत्नी सौ पंचशिला भिमराव कुऱ्हाडे माजी सरपंच यांच्या कार्यकाळात 2 कोटी 19 लाख रुपयाचे संरक्षण भिंतीचे काम पुर्ण केले . तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीत कॉक्रीट वालकंपाउंड चे बांधकाम करुण संडास बाथरूम तसेच ग्राउंड चे काम केले.

        तसेच लोतवाडा गावातील पिण्याच्या पाण्याकरीता वार्ड नं 2 नविन पाईप लाईन टाकण्याकरीता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण दर्यापूर येथे प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा देऊन काम पुर्णत्वास केले.

         ते गावातीलच नाही तर अमरावती अकोला जिल्ह्यातील विकास कामा करीता अग्रेसर असून बरेच आंदोलने त्यांनी करून शासन प्रशासनास ते वेठीस धरून भ्रष्ट्राचार उघडकीस आणून जिवावर उद्धार होऊन कामे करतात.

       वंचित बहुजन आघाडी तर्फे त्यांना उमेदवारी मिळाल्यास ते निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पिंपळोद सर्कल मधून नक्कीच विजयी होतीलच.

        सामाजिक क्षेत्रात ते नेहमी कार्यरत असून त्यांनी या पुर्वी जि परीषद निवडणूक लढवीली असून त्यांनी स्वताच्या कार्यावर त्यावेळी 930 मते मिळवीली होती.

        दर्यापूर तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून गेली 20 वर्षापासून सर्वसामान्याच्या हक्कासाठी व त्यांच्या सुखदुःखा सहभागी होऊन त्यांनी अत्यंत जबाबदारी पणे सेवा केली आहे.

        त्यांनी गावातील शेतकरी बांधवाकरीता शेतीच्या रस्त्याकरीता, शहानूर नदीवर नवीन पुल बांधण्याकरीता गावच्या विकासाकरीता 26 तास त्या रस्त्यावरच पाण्याचा एक थेंब न पीता अन्नत्याग आमरण उपोषन करुण प्रश्न मार्गी लावला असून असा जनसामान्याच्या त्याच्या हक्का करीता लढणारा कार्यकर्ता आम्हाला हवा अशी जनतेची मागणी आहे.