शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
दिव्य वंदना आधार फाउंडेशन जामगाव (कोमटी) येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही क्षण निराधारांसोबत घालवत त्यांची परिस्थिती व स्थिती जाणून घेतली आणि त्यांच्या सोबत संवाद करीत मनाला खुल्ले केले.
याचबरोबर दिव्य वंदना आधार फाउंडेशन जामगाव (कोमटी) येथील निवासी आधारातंर्गत निराधारांच्या पांघरुनांची व्यवस्था करीत त्यांना ब्लॉंकेटची व्यवस्था करुन दिली.
निराधारांना आधार देण्याची उत्तम भावना अविनाश अगडे यांच्या मनात आली आणि त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त दिव्य वंदना आधार फाउंडेशन जामगाव (कोमटी) येथे रहिवासी नागरिकांना ब्लॉंकेटची व्यवस्था करुन दिली.
निराधार असलेल्या महिला व पुरुषांच्या सोबत काही क्षण सहवासात राहणे म्हणजे उभ्या आयुष्याला समजून घेणे आहे.ज्यांचा कोणी वाली नाही ते कुठल्यातरी वृध्दाश्रमात,आश्रमात,किंवा एखाद्या संस्थेच्या स्थळावर राहतात.
पण,त्यांच्या वेदनांची व दुःखांची खोलीत समजून घेणे आणि त्यांच्या सुखदुःखात थोडेतरी सहभागी होणे हे मानुसकीचे तत्व असल्याने चिमूर कांग्रेस पक्ष शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी ते जपले असल्याचे दिसून येते.


