साईबाबा कालेज पारशिवनी येथील कुमारी शर्वरी राज्यस्तरीय तलवार बाजी स्पर्धेत खेळणार.. — गोंदिया येथे स्पर्धेचे आयोजन.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-

              जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत एक नोव्हेंबर रोजी गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धे करीता नागपूर जिल्हातुन पारशिवनी तालुक्यातील कुमारी शर्वरी गोसेवाडेची निवड करण्यात आली आहे.

           ती इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून १ नोव्हेंबर २०२३ ला गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तलवार बाजी स्पर्धेकरित ती खेळणार आहे.

          साईबाबा विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनीचे संचालक श्री. प्रकाशजी डोमकी यांनी तिला शुभेच्छा दिल्यात.त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष विजय बोथरा व सहसचिव डॉक्टर कुणाल डोमकी यांनी सुद्धा शर्वरीला हमखास यश मिळेल व राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत यश मिळवून केन्द्र स्तरीय स्पर्धेत साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनीचे नावलौकिक करेल अशी त्यांना आशा आहे.

           साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनीचे प्राचार्य व प्रशिक्षक श्री.अभिजीत फुलबांधे,त्याचप्रमाणे इतर प्राध्यापक वृंद यांनी शर्वरी यश संपादन करेलच असा आशावाद व्यक्त केला आहे व तिच्या कामगिरीवर किंचितही शंका नाही असे क्रिडा शिक्षक प्राचार्य अभिजित फुलबांधे सर यानी ठामपणे सांगितले.

         यापूर्वी सुद्धा शर्वरीने भारतीय संघाची प्रतिनिधित्व केले आहे आणि म्हणून साईबाबा कला व विज्ञान महाविद्यालय पारशिवनीचे प्राचार्य डॉक्टर योगेंद्र नगराळे,डॉक्टर प्रशांत इंगळे,प्रोफेसर विनोद पुरकम, प्रोफेसर अनिल बोंद्रे,डॉक्टर नीता देवी गुप्ता,प्रोफेसर मुरलीधर चहांदे,प्रोफेसर रवींद्र वंजारी,प्रा. रोशन आमले,प्रोफेसर जीशान हुमणे,नंदकिशोर मस्के,निलेश मिसाळ,शुभांगी शहारे,आचल गेडाम,सागर बावणे,नेहाल साव,पवन बेलावे महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पारशिवनीचे प्रतिष्ठित गणमान्य नागरिक यांनी सुद्धा कुमारी शर्वरीला सुवर्णपदक आणण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.