नीरा भीमा कारखाना ऊस बिलाचा पहिला हप्ता 2500 रुपये देणार – लालासाहेब पवार…

   बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर  प्रतिनिधी

                  शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन 2023-24 च्या गळीत हंगामामध्ये गळीत होणाऱ्या ऊसापोटी बिलाचा पहिला हप्ता रु. 2500 प्रमाणे देण्यात येणार असून, त्यानंतर ऊस बिलाचे पुढील हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे दिले जातील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सोमवारी (दि.30) दिली.

         निरा भिमा कारखाना चालू होणाऱ्या गळीत हंगामात इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देणार आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चालु गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पुर्ण केले जाईल, त्या दृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले आहे. कारखान्याची सर्व यंत्रणा पुर्णपणे सज्ज झाली असून, कारखाना आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहे. चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसाची सर्व बिले, वाहतूक कंत्राटदारांची बिले ही नियमितपणे देण्याचे सर्व नियोजन कारखान्याने केलेले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार हे प्रत्येक महिन्याला नियमित होत असून, दिवाळीसाठी एक महिन्याचा बोनस जाहीर करण्यात आला आहे, असे लालासाहेब पवार यांनी सांगितले.

       यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते.