बहिणीची लगबग,भाऊ आतुरलेला…. — रक्षाबंधन….

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

       भारत देशात रक्षाबंधनाला अनन्य साधारण महत्त्व आहे.रक्षाबंधनात,”प्रेम-मैत्री-सदभावना-आशिर्वाद व ऋणानुबंधणाचा,हृदयस्पर्शी सुयोग असतो.याचबरोबर सुखाच्या क्षणातील दुर्दम्य आशावाद अंतकरणातंर्गत मनात सखोल रुजलेला असतो.

       म्हणूनच रक्षाबंधना निमित्ताने भावाच्या घरी जाण्यासाठी बहिणीची लगबग ही विशाल सुखाचा पर्व असतो तर बहिण येण्याची भावाची आतुरता ही सखोल ऋणानुबंधनातंर्गत यशस्वी आयुष्याचा दूरगामी सदभाव असतो.

               तद्वतच रक्षाबंधन निमित्ताने भाऊबहिणीची होणारी भेट ही केवळ आणी केवळ भावाच्या सुखासाठी व त्याच्या यशस्वी आयुष्यासाठी संकल्पित आंत्तर व बाह्य संदभाव असतो.तो जगाच्या कुठल्याही बाजारात शोधूनही मिळत नाही आणि रुपयातही त्याला तोलता येत नाही.

               या उत्सवाच्या निमित्ताने बहिण जेव्हा भावासाठी सर्व सदभाव मनस्वी सादर करतय तेव्हा तिच्या मनात कसल्याही लोभाचा लवलेश राहात.याचाच अर्थ असा की रक्षाबंधन निमित्ताने बहिणीने अंतकरणातून भावासाठी सादर केलेला सदभाव हा अनेक क्षणापैकी महत्वपूर्ण व अमुल्य असतो.

             अर्थात भावाच्या हितासाठी व त्याच्या रक्षणासाठी सातत्याने धडपडणारी बहिण रक्षाबंधन निमित्ताने भावाचे सुख,त्याचा आनंद,त्याची समृद्धी ईच्छिते,ही लहान बाब नाही.

               भाऊबहिणीचे ऋणानुबंध हे अनेक नात्यातंर्गत कायम ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या बहिणीचे अंतकरण हे सद् कर्माचे बल असते हे विसरून चालता येत नाही.

             भाऊबहिणीचे अतुट नात जपताना कुणाच्याही मनात हिरमोड नसावा,रुसवेफुगवे नसावेत,एकमेकांच्या प्रति द्वेषभाव नसावा,राग नसावा असेच हे गहरे नात आहे.

               आईवडिलांचे पुण्य कर्म बहिणभावाला जगात आणत तेव्हा त्यांचा सदभावातंर्गत सदैव आशीर्वाद असतो की माझे मुलं हे दूर असले तरी नेहमी मिळून असावेत,नेहमी एकमेकांचा आधार ठरावेत.

            याचबरोबर भावानी, बहीणच्या भावना समजून घेत तिला उत्तम आयुष्य देण्यासाठी आपले मन सदभावनान्वये सदैव खुले ठेवावे हाच बहिणभावाचा सर्वोत्तम ऋणानुबंध असतो हे सर्व भावांना कळणे आवश्यक आहे.