Home Political पक्षात डिसिप्लिन व शिस्त असली पाहिजे :- विवेक हाडके…

पक्षात डिसिप्लिन व शिस्त असली पाहिजे :- विवेक हाडके…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

       वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणारा पक्ष आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वंचित बहुजन आघाडीत पक्षात रुजवून कार्यकर्त्यांना घडवण्याचे काम एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर चालवत आहे.

       गोरगरीब, दिनदलित, ओबीसी भटक्या विमुक्त या सर्वांना प्रश्न उचलण्यातचे काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करत आहेत खरा कार्यकर्ता घडवायचे असेल तर कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर झालं पाहिजे कार्यकर्ता कसा असावा त्याचे अधिकार काय म्हणून पक्षाची डिसिप्लिन व शिस्तअसणे अत्यंत आवश्यक आहे असे मतं विदर्भ समितीचे सदस्य विवेक हाडके यांनी साकोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हास्तरीय सभेत आपले मत व्यक्त केले.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वंचित बहुजन आघाडी जिल्हाप्रभारी भगवान भोंडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे, माजी माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले ,माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

          अध्यक्ष स्थानावरून बोलताना भगवान भोंडे यांनी सांगितले की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये आपल्याला तयारी करायची आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या प्रभागात कोणते उमेदवार तयार आहेत त्याची चाचपणी घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

       याप्रसंगी माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी, माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी यांचेही भाषणे झालितसभेत विविध ठराव घेण्यात आले ते ठराव वरिष्ठाकडे पाठवण्यात येणार आहेत.

         विविध विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये लाखनीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत नागदेवे लाखांदूर ते तालुका अध्यक्ष प्रभाकर मेश्राम,माजी जिल्हा सचिव अमित वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सभेचे आयोजक डी जी रंगारी यांनी केले तर आभार साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी यांनी मानले.

         कार्यक्रमांमध्ये महिला तालुका अध्यक्ष शितल नागदेवे, लाखनी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे, साकोली तालुका जगदीश रंगारी,यादोराव गणवीर, राधेश्याम कावळे, गीता वलथरे, विश्रांती बोरकर ,त्रिवेणी मेश्राम,आम्रपाली मोटघरे, आकाश गजभिये ,राहुल गजभिये, अमित नागदेवे,नितीन गजभिये, प्रशिक मोटघरे,वैभव मोटघरे,बाबुराव बोरकर, अजितकुमार गजभिये, सविता वालदे व इतर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.