Home उपक्रम साकोली आगाराचे प्रादेशिक समितीने केले अ वर्गासाठी परिक्षण… — प्रथम आल्यास...

साकोली आगाराचे प्रादेशिक समितीने केले अ वर्गासाठी परिक्षण… — प्रथम आल्यास मिळणार एक कोटी रूपयांचे बक्षिस…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : प्रवासांना स्वच्छ सुंदर बस स्थानकचा लाभ मिळावा दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचे’ प्रादेशिक स्तरावर अ’ वर्गात प्रादेशिक समितीने परीक्षण बुधवार दि. 30 जुलैला केले आहे. 

        हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत हे साकोली बसस्थानकाचे दुसरे सर्वेक्षण होते.ही तपासणी राज्य परिवहन . छत्रपती संभाजीनगर प्रदेशच्या प्रादेशिक व्यवस्थापक अनया बारटक्के, तसेच प्रादेशिक अभियंता अशोक पन्हाळकर. रा.प. छत्रपती संभाजीनगर प्रदेश तसेच प्रवासी मित्र भावेश कोटांगले, पत्रकार मनिषा काशिवार यांच्या उपस्थित पार पडले.

        साकोली आगाराचे आगार व्यवस्थापक सचिन आगरकर, भंडारा आगाराचे कामगार अधिकारी पराग शंभरकर कामगार, लेखाकार भुषण आगरकर प्रभारक रूपेश गोठे वरिष्ठ लिपीक मनोज खंडारे, वाहतुक नियंत्रक रशिद शेख व सर्व प्रशासकीय कर्मचारी चालक, वाहक ,यांत्रिक उपस्थित होते.प्रवाशांची सेवा अधिक सुखकर व्हावी व स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन अनेक नवनवीन संकल्पना राबवीत आहे.

       तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांच्या सेवेला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने स्पर्धात्मक अभियान हाती घेण्यात आले. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक असे या अभियानाला नाव देण्यात आले. वर्ष २०२३-२४ हे या अभियानाचे पहिले वर्ष होते. हे दुसरे वर्ष आहे.अ, ब, क वर्ग अशा तीन क्रमवारीत बसस्थानकांचे परीक्षण गुणांसह करण्यात येत आहे.

        परीक्षण झाल्यानंतर राज्यातील स्वच्छ व सुंदर बसस्थानकांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाचे हे दुसरे वर्ष आहे. या वर्षात पहिल्या टप्प्यातील परीक्षण पूर्ण झाले असून आता ‘अ’ वर्गासाठी साकोली बसस्थानकांचे दुसरे परीक्षण 30 जुलै करण्यात आले यात प्रथम क्रमांक मिळवण्यार्याना एक कोटी रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे साकोली आगाराने ब गटातील 25 लाखा रुपयांचे प्रथम बक्षिस मागील वर्षी मिळवले होते.