बाबुलवाडा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमात आषाढी एकादशी चे अवचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी दिंडी यात्रेने विद्यार्थी पालक वर्ग व गावकरी नागरिका समक्ष गावांमधून दिंडी यात्रा काढण्यात आली..

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:-शिक्षण विभाग नागपूर चे आदेशांचे पालन करून पारशिवनी येथिल लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबुळवाडा तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथे शैक्षणिक सत्र 2023 24 चा आरंभ प्रवेशोत्सव कार्यक्रम आगळ्यावेगळ्या प्रकारात घेऊन आषाढी एकादशी चे अवचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी दिंडी यात्रेने विद्यार्थी पालक वर्ग व गावकरी नागरिका समक्ष गावांमधून दिंडी यात्रा काढण्यात आली तत्परसंगी गावातील घरोघरी दिंडी पालखीची पूजा अर्चना करण्यात आली दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी फुगडी घालून ज्ञानोबा तुकाराम या गजरात भक्ती रसात एकलीन होऊन शालेय पटांगणात रिंगण भरून कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाकरिता शालेय मुख्याध्यापिका सौ.राजश्री राजीव उखरे पर्यवेक्षक श्री नारायण बावनकुळे सर, श्री देवेंद्र केदार सर, श्री गणेश जी राठोड सर केशवानंद संतापे सर आणि समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.

   

       विशेष उपस्थिती  महेंद्र शिक्षण संस्था नागपूर चे सचिव श्री पंकजराव हिरामणजी बावनकुळे साहेब याप्रसंगी मुलांना मार्गदर्शन केले सत्राआरंभीच त्यांना शालेय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले सर्वांनी शालेय पोषण आहाराचा व मिठाईचा वाटप सर्व विद्यार्थाना वाटप करण्यात आले असा हा आगळावेगळा कार्यक्रम लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबुळवाडा येथे साजरा करण्यात आला.