राज्य पत्रकार संघातर्फे वनमंत्री यांचा रोपटे देऊन सत्कार.

 

   दिक्षा कऱ्हाडे

   वृत्त संपादिका 

मूल:—-

     जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्सपालन मंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा रोपटे देऊन राज्य पत्रकार संघ तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

         नुकताच मूल येथे ना.मुनगंटीवार मित्रमंडळ व तालुक्यातील अनेक सामाजीक,राजकिय,शैक्षणिक संघटनांतर्फे भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

           राज्य पत्रकार संघ तालुका शाखा मूलचे अनेक पदाधिकारी अनुक्रमे मनिष रक्षमवार,सतिष राजूरवार,धमैश सुत्रपवार,राजू सुत्रपवार यांनी यावेळी फणसाचे रोपटे व शाल देऊन पालकमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार केला.सदर भेट वनमंत्री यांनी सोबत घेण्याची सुचना आपल्या सहकार्यांना केली.

       या भव्य स्वागत समारंभात तालुक्यातून ४ ते ५ हजारावर नागरिकांची उपस्थिति होती.