प्रगतशील सोयाबीन उत्पादक शेतकरी गुणेशजी झामाजी भक्ते यांच्या शेतात सोयाबीन बिजप्रक्रिया करून बी. बी. एफ.यंत्राद्वारे सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली.

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

पारशिवनी:-आज दिनांक २९ जुन २०२३ गुरुवार रोजी मौजा करंभाड येथे कृषि संजिवनी सप्ताह अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी मार्फत डॉक्टर ए टी गच्चे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करंभाड गावांच सरपंच भुनेश्वरी भुरसे यांचे अध्यक्षेत गावातील प्रगतशील सोयाबीन उत्पादक शेतकरी श्री. गुणेशजी झामाजी भक्ते यांच्या शेतामध्ये सोयाबीन बिजप्रक्रिया करुन बी.बी.एफ.यंत्राद्वारे सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली.मंडळ कृषि अधिकारी श्री सुरज शेंडे साहेब यांनी कृषि क्षेत्राची नवी दिशा या बदल सविस्तर मार्गदर्शन केले करंभाड गावचे कृषि सहाय्यक ए व्हि श्री ढोले यांनी सोयाबीन बियाणांची बिजप्रकिया चे फायदे व म्हतव समजुन सांगितले तसेच पारशिवनी-०१ चे कृषि पर्यवेक्षक श्री जे बी भालेराव सरानी बी. बी. एफ. तंत्रज्ञानाचे महिती व फायदे समजुन सांगितले व प्रक्षेत्रावर प्रत्यक्षिक दाखवण्यात आले सदर कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी डॉ. ए टी गच्चे. कार्यालयातील तंत्र सहाय्यक श्री ए.एन.देशमुख ,कृषि सहाय्यक श्री शिंदे,श्री झोंड,श्री.व्हि.डी.देशमुख,श्री. एस.एच.साठे ,करंभाड गावचे कृषिमित्र सुंधीरभाऊ धुंडे व गावातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सुरेशरावजी भक्ते,खुशालजी भक्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.