Home Political लोतवाडा ग्रा.प.च्या सरपंचपदी सौ.प्रिती गावंडे, उपसरपंचपदी विनायक मानकर यांची अविरोध निवड…

लोतवाडा ग्रा.प.च्या सरपंचपदी सौ.प्रिती गावंडे, उपसरपंचपदी विनायक मानकर यांची अविरोध निवड…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

        दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथिल तत्कालीन सरपंच सौ दुर्गा सुधीर गावंडे, उपसरपंच ओंकार बबन कात्रे व ग्रामपंचायत सदस्य शुभांगी अतुल भदे यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अप्पर आयुक्त यांनी दि 10 ऑक्टोबरला पदमुक्त केले होते.त्यानंतर ग्रामपंचायतच्या प्रशासकपदी सुरेश रामागडे यांची नियुक्ती केली होती. 

         आज (दि.29) येथिल ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यात सौ प्रिती मोहन गावंडे यांची सरपंचपदी तर विनायक देवमन मानकर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र धोटे हे उपस्थित होते.