युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूक रणसंग्राम सुरू झाला असून कोण कोणत्या सर्कल मधून निवडणूक लढवणार यासाठी सर्वत्र चर्चा तालुक्यातील सर्व गावागावात चालू आहेत.
दर्यापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद सर्कल हे अनुसुचित जाती साठी आरक्षित झाले असून पिंपळोद जिल्हा परिषद सर्कल वगळता तिन्ही जिल्हा परिषद सर्कल हे अनुसूचित जाती महिलांकरीता आरक्षित आहेत. या निवडणुकीत नविन चेहरे समोर येत असून पिंपळोद जिल्हा परिषद सर्कलमधून सांगळूदचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच शरद आठवले हे निवडणूक रिंगणात असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
जिल्हा परिषद मधिल समिरकरण लक्षात घेऊन नागरिकांच्या विचारानुसार योग्य पक्षाद्वारे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शरद आठवले हे गेल्या अनेक वर्षांपासून दर्यापूर तालुक्यातील राजकीय,सामाजिक, क्षेत्रात कार्यरत असून तालुक्यातील चारही जिल्हा परिषद सर्कल मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून त्या बळावर ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
दोनवेळा ग्रामपंचायत सदस्य व आता विद्यमान उपसरपंच असलेले शरद आठवले यांचे सर्व राजकीय पक्ष,सामाजिक संघटना व सर्व धर्माच्या नागरिकांशी जवळचे संबंध आहेत.



