युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर नगर परिषद निवडणूक रणसंग्राम सुरू झाला असून कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा दर्यापूर शहरात रंगली आहे.
यावेळी दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत नविन चेहरे समोर येत असून प्रभाग क्रमांक 5-ब मधून या भागातील रहिवासी व पत्रकार अजय वर हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
प्रभागातील समिरकरण लक्षात घेऊन नागरिकांच्या विचारानुसार योग्य पक्षाद्वारे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अजय वर हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय,सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून दर्यापूर शहरातील नगर परिषद प्रभागामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून गेल्या 30 वर्षापासून सर्वसामान्याच्या हक्कासाठी व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन अत्यंत जबाबदारी पणे सेवा कार्य आहेत.त्या बळावर ते निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



