Home Political महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांचे बच्चू कडूना...

महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांचे बच्चू कडूना फोन… — मुंबईला बोलावणे फेटाळले,नागपूरला या किंवा महाएल्गार मोर्चास्थळी या!.. — चर्चा कशाला कर्जमुक्ती करांना!,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळावर शेतकरी विश्वास दाखवायला तयार नाही!..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

           शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती बाबत व इतर मागण्या संबंधाने चर्चा करण्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबईला यावे म्हणून महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे व सलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी त्यांना काॅल केले.

        पण,चर्चाअंती तुम्ही महा एल्गार मोर्चा स्थळी या किंवा नागपूरला या असे बच्चू कडू यांनी त्यांना सांगितले व मुंबईला बोलावण्याची मागणी अमान्य केली.

         माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसह इतर मागण्या केल्या आहेत.त्या मागण्या महाराष्ट्र सरकार मान्य करण्यास अनकानी का म्हणून करतय?हा प्रश्न आहे.

           भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान करणारे निर्णय एका झटक्यात घेणारे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कानाडोळा करीत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री हे बेजबाबदारपणे वागतात हे प्रामुख्याने लक्षात येते आहे.

          माजी राज्यमंत्री आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सरकारच्या सर्व चाली व चालख्या ओळखल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांवर विश्वास दाखवायला ते व शेतकरी तयार नाहीत.

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रीमंडळाची बैठक घेऊन शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला हिंमत का म्हणून दाखवत नाही?

            स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करणार काय?,”पण,आता महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांनी ओळखले असून त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.