लक्षवेधी
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये स्वच्छ पाण्याची सुविधा नाही,कामे नाहीत,नाल्यांचे बांधकामे नाहीत,रुपयांचा हिशोब नाही,कामाविना रुपये खर्च,यामुळे परेशान झालेल्या मौजा दाबकाहेट्टी व मौजा कोटगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामसेवक घनश्याम उके यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कुलुपबंद केले आहे.
मौजा कोटगाव गटग्रामपंचायत मध्ये पुढील कामांसाठी वित्त मंजूरीसाठी व झालेल्या कामांची बिले मंजूर करुन घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते.
मात्र,या महत्त्वपूर्ण ग्रामसभेला सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी दांडी मारली.सातपैकी मौजा दाबकाहेट्टी येथील एक महिला सदस्या हजर होत्या.यामुळे ग्रामस्थ नाराज झाले.
म्हणूनच त्यांनी ग्रामसेवक श्री.घमश्याम उके यांना मौजा कोटगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कुलूपबंद केले असल्याचे दिसून आले.
मागील चार वेळा ग्रामसभा तहकूब होत असल्याचे उपस्थित ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मात्र तहकूब ग्रामसभा परत का म्हणून घेतलेल्या जात नाही? हा प्रश्न अधिकच चिंताजनक तथा गंभीर आहे.
ग्रामसेवक कुलूपबंद असल्याची व इतर घडामोडींची माहिती चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेली आहे.परंतु ते काय भूमिका घेतात हे काही तासात कळणार आहे.



