Home Maharashtra इंधन व गॅस दरवाढ संदर्भात काँग्रेसचा एल्गार; चिमूरात भव्य जनआंदोलन….

इंधन व गॅस दरवाढ संदर्भात काँग्रेसचा एल्गार; चिमूरात भव्य जनआंदोलन….

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी

चिमूर :- पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या दरांविरोधात काँग्रेस पक्षाने चिमुरात जोरदार एल्गार पुकारला आहे.महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात चिमूर तालुका काँग्रेस कमिटीने निदर्शने,मोर्चे आणि जनआंदोलन सुरू केले आहेत.

     गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनेक वेळा वाढ झाल्याने वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

        त्याचबरोबर घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे गृहिणी,छोटे व्यावसायिक आणि हॉटेल व्यवसायिकांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

       या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत “महागाई कमी करा”, “इंधन दरवाढ मागे घ्या” अशा मागण्या केल्या.हजारे पेट्रोल पंपा समोर निदर्शने करण्यात आली.काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

       चिमूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आले,काँग्रेसने दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल दरम्यान बाजारातील वाढती इंधन किंमत मुळे दरवाढ झाल्याचे स्पष्ट केले.

       शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी न लावता पुरवठा केला पाहिजे अशी मागणी सुद्धा करण्यात आली,वरील निदर्शने आंदोलनात आहे इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

      वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

       राज्यातील विविध शहरांमध्ये युवक काँग्रेस व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी मोर्चे,रास्ता रोको तसेच निषेध सभा घेण्यात आल्या. 

     काँग्रेसने इशारा दिला असून,दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

      या आंदोलनात,महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे महासचिव प्रा.राम राऊत,चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विजय गावंडे पाटील,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जुनेद भाई खान,किशोर शिंगरे,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सचिन जी गाडीवार, काँगेस नेते घनश्यामजी चापले,आदिवासी सेलचे अध्यक्ष शांताराम सेलवटकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष बब्बू खान, SC सेलचे अध्यक्ष स्वप्निल मालके,विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत डवले,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेश चट्टे,तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामदास चौधरी,काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मधुकर मुंगले,मासळ सर्कल प्रमुख सुभाष बनसोड,NSUI तालुकाध्यक्ष श्रीकांत गेडाम,सुभाष करारे,पांडुरंग डोये,भाऊजी नागोसे,दुर्योधन तांबरभोगे,सतीश वनकर,प्रशांत बोबडे,देविदास गजभिये,अमित मेश्राम,गणेश कारेकर,व इतर मान्यवर उपस्थित होते.